पनवेलकरांना मोठा दिलासा, आता विविध प्रमाणपत्रांसाठी लागणारे शुल्क भरता येणार एका क्लिकवर, महापालिकेचा उपक्रम

| Updated on: May 27, 2022 | 10:43 AM

विविध प्रमाणपत्रांसाठी आवश्यक असलेले शुल्क भरण्यासाठी आता पनवेलकरांना महापालिकेत जाण्याची गजर नाही. आता हे शुल्क ऑनलाईन देखील भरता येणार आहे.

पनवेलकरांना मोठा दिलासा, आता विविध प्रमाणपत्रांसाठी लागणारे शुल्क भरता येणार एका क्लिकवर, महापालिकेचा उपक्रम
Image Credit source: facebook
Follow us on

नवी मुंबई : पनवेलकरांसाठी आनंदाची बातमी आहे. विविध प्रकारचे शुल्क (Fees) भरण्यसाठी होणारी पायपीट आता थांबणर आहे. पनवेलकरांना आता विविध प्रमाणपत्रांसाठी (Certificate) लागणारे शुल्क एका क्लिकवर भरता येणार आहे. विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मूल्यांकन शुल्क, हस्तांतर शुल्क, परवाना शुल्क, एनओसी, वीज मीटर परवाना शुल्क व अन्य दैनंदिन शुल्काचा यामध्ये समावेश असणार आहे. सोबतच नागरी करांचे संकलन, कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणातील दंड, स्वच्छता, अतिक्रमण, प्लॅस्टिकबंदी व घनकचरा व्यवस्थापन याच्यांशी संबंधित दंड देखील याच पद्धतीने भरता येणार आहे. अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. पनवेल महापालिकेकडून (Panvel Municipal Corporation) सध्या डिजिटायझेशनला प्राधान्य देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता महापालिकेच्या वतीने यंत्रणेत बदल करण्यात येत असल्याचे पहायला मिळत आहे. नागरिकांना आता आपला कर थेट ऑनलाईन भरता येणार आहे. नागरिकांना संबंधित विभागात जाण्याची आवश्यकता नाही.

बँक ऑफ इंडियाशी टायप

ग्राहकाना ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वर्ल्ड लाईन या पेमेंट क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने बँक ऑफ इंडियाशी टायप केले आहे. बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक राजेंद्र कोकाटे व वर्ल्ड लाइनचे ईव्हीपी गुलशन पृथी यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंत करण्यात आला. यावेळी पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची देखील उपस्थिती होती. ही सेवा सुरू झाल्याने नागरिकांचे कष्ट वाचाणार आहेत. नागरिकांना विविध शुल्क भरण्यासाठी आता महापालिकेत किंवा संबंधित विभागात जाण्याची गरज नाही. नागरिक आता एका क्लिकवर शुल्क भरू शकतील अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

नागरिकांना होणार फायदा

पनवेल महापालिकेने सुरू केलेल्या या ऑनलाईन सेवेचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मूल्यांकन शुल्क, हस्तांतर शुल्क, परवाना शुल्क, एनओसी, वीज मीटर परवाना शुल्क असे विविध प्रकारचे शुल्क भरण्यासाठी संबंधित विभागात जावे लागते. या प्रक्रियेत वेळ आणि पैसा खर्च होतो. दरम्यान आता हेच काम ऑनलाईन होणार असल्याने नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. तसेच या माध्यमातून महापालिकेचा महसूल देखील वाढू शकतो.

हे सुद्धा वाचा