PPF Scheme : 3 वर्षाच्या मुलाच्या नावे रक्कम गुंतवा, 15 वर्षानंतर 32 लाखांचा हमखास परतावा

| Updated on: May 16, 2022 | 8:41 AM

PPF : तीन वर्षाच्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पीपीएफ हा एक हमखास चांगला परतावा देणारा पर्याय आहे. तीन वर्षाच्या मुलाच्या नावे दरमहा दहा हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास 18 व्या वर्षी त्या मुलाला 32 लाख 16 हजारांचा हमखास परतावा मिळेल.

PPF Scheme : 3 वर्षाच्या मुलाच्या नावे रक्कम गुंतवा, 15 वर्षानंतर 32 लाखांचा हमखास परतावा
Money INR
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

प्रत्येकाला त्याच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल आणि सुखमय असावे असे वाटते. आई-वडिल म्हणून मुलांची काळजी करतात. त्यांच्या भविष्यासाठी वर्तमानात कष्ट उपसतात. तुमच्या कष्टाचे योग्य चिज झाले तर त्याहून सोन्याहून पिवळे ते काय. तर अशीच एक सोन्यासारखी योजना तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आहे, भविष्य निर्वाह निधी योजना (Public Provident Fund) मुलांना योग्य वेळी रक्कम मिळावी यासाठी गुंतवणुकीचे सुक्ष्म नियोजन (Micro Planning) केल्यास दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवणूक करुन दीर्घ कालावधीनंतर (Long time) मोठी रक्कम प्राप्त करु शकता. पीपीएफ खात्यात तुमच्या लहान मुलांच्या नावे खाते उघडू शकता. एक निश्चित रक्कम या खात्यात जमा करता येते. दर महा केलेली गुंतवणूक मुले मोठी झाली की, त्यांच्या शिक्षणासाठी आणि करियरसाठी उपयोगी पडू शकते. विशेष म्हणजे ही योजना लोकप्रिय असून त्याला सरकारचे संरक्षण आहे. कोणत्याही बँकेत अथवा टपाल खात्यात तुम्हाला भविष्य निर्वाह निधीचे खाते  उघडता येते.

कसे उघडाल खाते

सर्वात अगोदर जाणून घेऊयात लहान मुलांच्या नावे पीपीएफ खाते कसे उघडाल ते. त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवशकता असेल याविषयी. पीपीएफ खात्याचे एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये वयाची कोणतीही अट नाही. कोणत्याही वयात याचे खाते उघडता येईल आणि गुंतवणुकीला तात्काळ सुरुवात करता येते.

यासाठी तुम्हाला एखाद्या अधिकृत बँकेत जावे लागेल. त्याठिकाणी फॉर्म 1 भरुन द्यावा लागेल. यापूर्वी या अर्जाचे नाव फॉर्म ए असे होते. आता त्याचे नाव बदलण्यात येऊन फॉर्म 1 असे झाले आहे. घरा शेजारील कोणत्याही अधिकृत बँकेच्या शाखेत जाऊन तुम्ही पीपीएफ खाते उघडू शकता.

हे सुद्धा वाचा

कोणती कागदपत्रे महत्वाची

खाते उघडण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट वाहन चालविण्याचा परवाना, निवडणूक ओळखपत्र, राशन कार्ड याविषयीची माहिती द्यावी लागेल. ओळखपत्रात तुम्हाला पॅनकार्ड, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन परवाना या कागदपत्रांचा उपयोग होतो. तसेच खाते उघडण्यासाठी लहान मुलाचा जन्मदाखला द्यावा लागेल. एक पासपोर्ट साईज छायाचित्र द्यावे लागेल. खाते उघडण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 500 रुपये वा त्यापेक्षा अधिकची रक्कम द्यावी लागेल. एकदा हा कागदपत्रांचा सोपास्कर पूर्ण झाला की बँक तुमच्या मुलाच्या नावे पीपीएफ पासबूक काढेल.

32 लाखांचे गणित असे जुळेल

3 वर्षांच्या मुलांच्या नावे पीपीएफ खाते उघडल्यानंतर त्याच्या खात्यात निश्चित दहा हजार रुपये दरमहा जमा केल्यास तुमचे 32 लाखांचे उद्दिष्ट गाठता येईल. सध्या पीपीएफ खात्यावर 7.10 टक्क्याने व्याज मिळत आहे.

या हिशेबाने 15 वर्षांकरीता गुंतवणूक केल्यास 32 लाख 16 हजार 241 रुपये मुलाच्या 18 व्या वर्षी मिळतील. ही रक्कम त्याच्या उच्च शिक्षणासाठी उपयोगी पडेल.