Voltas Split AC : काय बोलता! ACवर 26 हजारांची सूट, खास ऑफर जाणून घ्या…

Voltas Split AC : काय बोलता! ACवर 26 हजारांची सूट, खास ऑफर जाणून घ्या...
Voltas Split AC
Image Credit source: twitter

बाजारात या एसीची किंमत 61 हजार 990 रुपये आहे. तर डिस्काउंटनंतर तुम्ही 35 हजार 990 रुपयांना खरेदी करू शकता.

शुभम कुलकर्णी

|

May 16, 2022 | 7:04 AM

मुंबई : उन्हाळ्यात फ्लिपकार्टवर (flipkart) एसीची (AC) विक्री सुरू आहे. या सेलमध्ये अनेक एसींवर भरघोस सूटही उपलब्ध आहे. Voltas 1.5 टन 3 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर AC वर 41 टक्क्यांपर्यंत सूट आहे. बाजारात या एसीची किंमत 61 हजार 990 रुपये आहे. तर डिस्काउंटनंतर (Discount) तुम्ही 35 हजार 990 रुपयांना खरेदी करू शकता. विशेष बाब म्हणजे या एसीचे 2022 मॉडेल उपलब्ध आहे. व्होल्टास 1.5 टन 3 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसीमध्ये फक्त पांढऱ्या रंगाचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये कॉपर कंडेन्सर कॉइलचा वापर करण्यात आला आहे. बीईई रेटिंग 2022 मध्ये याला 3 स्टार रेटिंग देण्यात आले आहे. नॉन-इन्व्हर्टर एसीच्या तुलनेत हा एसी सुमारे 15 टक्के स्वस्त मिळत आहे. एकदा वीज गेली की तुम्हाला ती पुन्हा सेट करण्याची गरज नाही.

रिप्लेसमेंट वॉरंटी

कॉपर कंडेन्सरमध्येही एसीचे कूलिंग वाढते. तसेच ते सहजपणे दुरुस्त केले जाऊ शकते. तुम्ही ते फ्लिपकार्टवरून खरेदी केल्यास तुम्हाला 10 दिवसांची रिप्लेसमेंट वॉरंटी देखील मिळेल. याशिवाय या एसीवर बँक ऑफर्सही सुरू आहेत. तुम्हाला ICICI बँक क्रेडिट कार्डने पेमेंटवर 10% सूट मिळते. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्डवरून खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅक देखील मिळेल.

Daikin वर देखील सवलत

डायकिन 1.5 टन 3 स्टार इन्व्हर्टर स्प्लिट एसी खरेदी करण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. सध्या या एसीवर 13 हजार 110 रुपयांची सूट आहे. म्हणजेच या एसी वर जवळपास 26 टक्के डिस्काउंट चालू आहे. तुम्हाला EMI व्यवहारावर रु. 1500 चा कॅशबॅक मिळत आहे. हा कॅशबॅक Indusland Bank क्रेडिट कार्डवरील EMI व्यवहारांवर उपलब्ध असेल. डायकिनच्या या एसीमध्ये डीसी मोटरचा वापर करण्यात आला आहे. तसेच यात R32 रेफ्रिजरंट आहे. Daikin ETKL50TV वर कंपनीकडून 10 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे.

15 टक्के स्वस्त

विशेष बाब म्हणजे या एसीचे 2022 मॉडेल उपलब्ध आहे. व्होल्टास 1.5 टन 3 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसीमध्ये फक्त पांढऱ्या रंगाचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये कॉपर कंडेन्सर कॉइलचा वापर करण्यात आला आहे. बीईई रेटिंग 2022 मध्ये याला 3 स्टार रेटिंग देण्यात आले आहे. नॉन-इन्व्हर्टर एसीच्या तुलनेत हा एसी सुमारे 15 टक्के स्वस्त मिळत आहे. एकदा वीज गेली की तुम्हाला ती पुन्हा सेट करण्याची गरज नाही.

हे सुद्धा वाचा

35 हजार 990 रुपयांना खरेदी

Voltas 1.5 टन 3 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर AC वर 41 टक्क्यांपर्यंत सूट आहे. बाजारात या एसीची किंमत 61 हजार 990 रुपये आहे. तर डिस्काउंटनंतर तुम्ही 35 हजार 990 रुपयांना खरेदी करू शकता.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें