Honda Offers : होंडाची कार घेताय! कंपनीच्या या गाड्यांवर मिळणार सूट, काय आहे ऑफर? जाणून घ्या…

कोणतीही वस्तू घेताना त्या वस्तूची चार ठिकाणी चौकशी करावी, वस्तूच्या किंमतीची आणि वैशिष्ट्यांमधील तफावत बघावी.

Honda Offers : होंडाची कार घेताय! कंपनीच्या या गाड्यांवर मिळणार सूट, काय आहे ऑफर? जाणून घ्या...
कंपनीच्या या गाड्यांवर मिळणार सूटImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 8:13 AM

मुंबई : गाडी (Car) किंवा कोणतीही वस्तू घेताना त्या वस्तूची चार ठिकाणी चौकशी करावी, वस्तूच्या किंमतीची आणि वैशिष्ट्यांमधील तफावत बघावी, असं अनेकदा बोललं जातं. पण आपण याकडे फारसं लक्ष देत नाही. यामुळे आपल्या हातातून चांगल्या ऑफर्स देखील जाऊ शकतात. विशेष म्हणजे मोठ्या कंपन्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी देत असतात. मे 2022 मध्ये म्हणजे याच महिन्यात Honda कारमध्ये (Honda Cars India) सवलत सवलत असल्याचं बोललं जातंय. या महिन्यात कारवर जोरदार ऑफर दिल्या आहेत. या जपानी ऑटोमेकरने आपल्या सर्व कारवर या ऑफर (Honda Offers) दिल्या आहेत. ज्या ग्राहकांसाठी 31 मे पर्यंत उपलब्ध असणार आहेत. या सर्व सवलती Honda Amaze, Honda City, Honda WRV (WR-V) आणि Honda Jazz च्या पाचव्या आणि चौथ्या पिढीवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. Honda Cars India ने या सर्व कारवर मॉडेल आणि प्रकारानुसार एकूण 33 हजार रुपयांपर्यंत ऑफर दिल्या आहेत.

होंडा सिटी 5 वी जनरेशन

कंपनीने या सेडानवर 30 हजार 396 रुपयांची कमाल सूट दिली आहे. यामध्ये 5 हजार रुपयांपर्यंत रोख सवलत, कार एक्सचेंजवर 5 हजार 396 रुपयांचे फायदे, जुन्या होंडा ग्राहकांसाठी 5 हजार रुपयांपर्यंतचा लॉयल्टी बोनस, 5 हजार रुपयांपर्यंतचा होंडा कार एक्सचेंज बोनस, विद्यमान होंडा कारसाठी 7 हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त एक्स्चेंज सवलत यांचा समावेश आहे. ग्राहक आणि माजी होंडा ग्राहकांवर 8 हजार कॉर्पोरेट सूट आहे.

होंडा सिटी 4थी जनरेशन

चौथ्या पिढीच्या Honda City वर एकूण 20 हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर देण्यात आल्या आहेत. कंपनीने जुन्या Honda ग्राहकांना 5 हजारपर्यंतचा लॉयल्टी बोनस  7 हजारपर्यंत Honda कार एक्सचेंज ऑफर आणि 8 हजारपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट दिला आहे.

हे सुद्धा वाचा

होंडा जाझ

Hondaने या प्रीमियम हॅचबॅकवर ग्राहकांना एकूण 33 हजार 158 रुपयांपर्यंतचा लाभ दिला आहे. यामध्ये 10 हजार रुपयांपर्यंत रोख सवलत किंवा 12 हजार 158 रुपयांपर्यंतच्या FOC अ‍ॅक्सेसरीज, एक्सचेंज बोनससाठी 5 हजार रुपये, जुन्या Honda ग्राहकांसाठी 5 हजार रुपयांपर्यंतचा लॉयल्टी बोनस, Honda कार एक्सचेंजवर 7 हजार रुपये आणि कॉर्पोरेट सूट, चार हजार रुपयांपर्यंतचा समावेश आहे.

होंडा WR-V

कंपनीने आपल्या सब-कॉम्पॅक्ट SUV Honda WR-V वर एकूण 26 हजार ऑफर दिल्या आहेत. ज्या सर्व पेट्रोल प्रकारांवर दिल्या जात आहेत. यामध्ये कार एक्सचेंजवर 10 हजार रुपयांपर्यंतचा बोनस, जुन्या ग्राहकांसाठी 5 हजार रुपयांपर्यंतचा लॉयल्टी बोनस, Honda कारच्या देवाणघेवाणीवर 7 हजार रुपयांपर्यंतचे फायदे आणि 4 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट यांचा समावेश आहे.

होंडा अमेझ

शेवटी अमेझ सब-कॉम्पॅक्ट सेडानची पाळी आली आहे. ज्यावर कंपनीने सर्व प्रकारांवर एकूण 9 हजार रुपयांपर्यंत सूट दिली आहे. यामध्ये 31 मे 2022 पर्यंत जुन्या होंडा ग्राहकांना 5 हजार रुपयांपर्यंतचा लॉयल्टी बोनस आणि 4 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सवलत दिली जात आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.