Epassport | आता विमान प्रवाशांच्या खिश्यात ई-पासपोर्ट 

| Updated on: Jan 14, 2022 | 9:06 AM

देशात ई-पासपोर्ट सेवा लवकरच सुरु होत आहे.  टीसीएसला ( TCS  ) पासपोर्ट सेवा कार्यक्रमाचा (पीएसपी) दुसरा टप्पा सुरू करण्याची परवानगी मिळाली.  ई-पासपोर्ट पूर्णपणे पेपर-मुक्त असणार नाही.  त्यात काही कागदपत्रे देखील असतील. पेपरची आवश्यकता असेल.  देशात पहिल्या टप्प्यात पासपोर्ट कार्यक्रमातंर्गत 86  दशलक्षाहून अधिक लोकांना पासपोर्ट जारी करण्यात आले होते. आता दुस-या टप्प्यात ई-पासपोर्ट सेवेआधारे भारत  ई-पासपोर्ट प्रचलित आहेत अशा देशांच्या यादीत दिसेल.

Epassport  | आता विमान प्रवाशांच्या खिश्यात ई-पासपोर्ट 
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

मुंबई : टाटाची आघाडीची कंपनी टीसीएस या कंपनीला ई-पासपोर्ट ( e passport  ) बनवण्याचे काम मिळाले आहे. ई-पासपोर्ट काही महिन्यांत प्रवाशांच्या खिशात असतील. ते तयार करण्याचे काम केवळ टीसीएसकडे असले, तर ते छापण्याचा आणि  देण्याचा पूर्ण अधिकार सरकारकडे राहिल.देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यातदार टीसीएसला ( TCS  ) पासपोर्ट सेवा कार्यक्रमाचा ( PSP  ) दुसरा टप्पा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत भारतातील लाखो लोकांचे पासपोर्ट तयार केले जातील. टाटाची कंपनी टीसीएस नवीनतम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करेल. टीसीएस यावेळी ई-पासपोर्ट ( e passport  ) देखील सादर करणार आहे. ही प्रक्रिया अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत होती.

टीसीएसने ई-पासपोर्टबद्दल म्हटले आहे की, “आम्ही आपले नवीनतम तंत्रज्ञान घेऊन येत आहोत, परंतु केंद्र सरकारच पासपोर्ट मंजूर करेल किंवा छापेल.” ई-पासपोर्ट पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक असेल अथवा कसे असेल याबद्दल लोकांमध्ये कुतुहल आहे. टीसीएसने स्पष्ट केले आहे की ई-पासपोर्ट पूर्णपणे पेपर-मुक्त असणार नाही.  त्यात काही कागदपत्रे देखील असतील. पेपरची आवश्यकता असेल कारण व्हिसा स्टॅम्पिंग अजूनही सुरु आहे जे कागदावर केले जाऊ शकते. कंपनीचे म्हणणे आहे की नंतरभविष्यात ऑटोमेशनद्वारे कागदाची गरज नाहीशी केली जाऊ शकते

पासपोर्ट चिप बसविण्यात येईल

पासपोर्ट जॅकेटमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप असेल, जी सुरक्षेशी संबंधित सर्व माहिती रेकॉर्ड करेल. जगातील अनेक देशांकडे ई-पासपोर्ट सेवा आहे आणि अनेक देशही त्यावर काम करत आहेत. पण भारताचा ई-पासपोर्ट उर्वरित देशापेक्षा पूर्णपणे वेगळा असेल. काही महिन्यांत ज्या देशांमध्ये ई-पासपोर्ट प्रचलित आहेत अशा देशांच्या यादीत भारतही असेल. टीसीएसने देशात पहिल्या टप्प्यातील पासपोर्ट कार्यक्रमदेखील सुरू केला आहे ज्यात ८६ दशलक्षाहून अधिक लोकांना पासपोर्ट  देण्यात आले होते. भविष्यात भारतातील लोक जगाच्या विविध भागात प्रवास करतील आणि यामुळे पासपोर्ट बनवण्याच्या कामाला आणखी गती मिळेल.

अनेक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर 

पासपोर्ट छापणे आणि देणे वगळता टीसीएस त्याच्याशी संबंधित सर्व काम पाहील. लोकांची माहिती साठवण्यासाठी तिसरे डेटा सेंटर सुरू केले जात आहे. पहिल्या टप्प्यात दोन डेटा सेंटर तयार करण्यात आले होते. कंपनी या प्रकल्पासाठी अनेक तंत्रज्ञान कौशल्य आत्मसात केलेल्या कामगारांची भरती करेल.  याशिवाय पासपोर्ट सेवा केंद्रांसाठी फ्रंट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांचीही भरती केली जाणार आहे. ई-पासपोर्टमध्ये बायोमेट्रिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रगत डेटा अॅनालिटिक्स, चॅटबोट्स, ऑटो रिस्पॉन्स, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि क्लाऊड यांचा वापर केला जाईल. लोक वापरत असताना आणि अनुभवत असताना ई-पासपोर्टमध्ये सुविधा जोडल्या जातील

बोटांचे ठसे आणि आयरिसचा वापर

पासपोर्टमध्ये बोटांचे ठसे आधीच वापरले जातात. फिंगरप्रिंटिस बायोमेट्रिक्सचाही (Biometrics) एक भाग आहे. त्यामुळे ई-पासपोर्टमध्ये केवळ बोटांचे ठसेच नसतील तर विविध प्रकारच्या सुविधांमध्ये भर पडेल. व्यक्ती ओळखण्यासाठी बोटांच्या ठशांव्यतिरिक्त आयरिस आणि अल्गोरिदम वापरेल. आयरिस त्या व्यक्तीची ओळख पटवेल आणि फसवणूक रोखण्यास मदत करेल. ई-पासपोर्टमधील आयरिसची सुविधाही वाढविण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

विनाकारण रेल्वेची साखळी ओढाल, सरकारी नोकरीला मुकाल; वाचा महत्वाचा नियम

‘ओमिक्रॉन’चं मळभ हटलं: सलग पाचव्या दिवशी मार्केटमध्ये तेजी, टाटा स्टील चकाकले!

टीसीएसचे पुन्हा ‘बायबॅक’: पाच वर्षातील विक्रमी आकडा, कमाईची बंपर संधी!