टीसीएसचे पुन्हा ‘बायबॅक’: पाच वर्षातील विक्रमी आकडा, कमाईची बंपर संधी!

टीसीएसच्या अहवालानुसार, मागील वर्षाच्या तुलनेत नफ्यात 12 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीने 16 टक्क्यांच्या वाढीसह 49 हजार कोटींचा टप्पा गाठला आहे. टीसीएस 4500 रुपये प्रति शेयर किंमतीवर शेअर बायबॅक करणार आहे.

टीसीएसचे पुन्हा ‘बायबॅक’: पाच वर्षातील विक्रमी आकडा, कमाईची बंपर संधी!
भारतात सर्वाधिक गुंतवणुकदारांची या योजनेला पसंती लाभली आहे. सर्वोत्तम परतावा आणि पैशांची सुरक्षितता यामुळे रिकरिंगकडे गुंतवणुकदारांचा वाढता कल आहे. तुम्ही भविष्यातील गुंतवणुकीचे नियोजन करुन या योजनेत पैसे गुंतवू शकतात. प्रत्येक गुंतवणुकदाराची जोखीम क्षमता भिन्न आहे. शेअर्स बाजारात तुलनेने अधिक पैसे मिळत असल्यास तितक्याच प्रमाणात जोखीम स्वीकारावी लागते. त्यामुळे रिकरिंग डिपॉझिट स्कीमच्या बाबतीत तुम्हाला कमी जोखमीत तुलनेने सर्वोत्तम परतावा निश्चितच प्राप्त होईल.

नवी दिल्ली : भारतातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसने ( Tata Consultancy Services) आर्थिक तिमाहीची आकडेवारी घोषित केली आहे. टीसीएसने 18 हजार कोटी शेअर्स बायबॅक (Buyback) आणि डिव्हिडंडची (Dividend) घोषणा केली आहे. टीसीएसच्या अहवालानुसार, मागील वर्षाच्या तुलनेत नफ्यात 12 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीने 16 टक्क्यांच्या वाढीसह 49 हजार कोटींचा टप्पा गाठला आहे. टीसीएस 4500 रुपये प्रति शेयर किंमतीवर शेअर बायबॅक करणार आहे. बुधवार बंद स्तरावर 3857 च्या तुलनेत 17 टक्के अधिक आहे. कंपनी 18 हजार कोटींचे शेअर बायबॅक करणार आहे. त्यासोबतच कंपनीने प्रति शेअर 7 रुपयांच्या तिसऱ्या अंतरिम डिव्हिडंडची घोषणा केली आहे. डिव्हिडंडची रेकॉर्ड तारीख 20 जानेवारी असणार आहे. तसेच 7 फेब्रुवारीला डिव्हिडंडची घोषणा केली जाणार आहे.

टीसीएसच्या आर्थिक तिमाही (Q3) अहवालाची टॉप-10 महत्वाची वैशिष्ट्ये

1. मागील वर्षाच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात 12.3 टक्क्यांची वाढ
2. मागील वर्षाच्या तुलनेत कंपनीला 9769 कोटींचा नफा
3. गेल्या वर्षी कंपनीला 8701 कोटींचा नफा झाला होता
4. कंपनीच्या उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत 16.3 टक्क्यांच्या वाढीसह 48,885 कोटींच्या टप्प्यावर पोहोचले आहे.
5. कंपनीच्या अहवालानुसार, तिमाही दरम्यान ऑपरेटिंग मार्जिन
25 टक्के राहिले आहे.
6. कंपनीच्या क्लायंटची संख्या 58 पर्यंत पोहोचली आहे.
7. अहवाल काळात 10 कोटी डॉलरहून अधिक 10 नवे ग्राहक जोडले गेले आहेत.
8. आर्थिक तिमाही दरम्यान 5 करोड डॉलरहून मोठ्या क्लायंटची संख्या 21 ने वाढीसह 118 झाली आहे.
9. टीसीएस अनुसार, सर्व व्हर्टिकल्स मध्ये 14 ते 20 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली.
10. रिटेल आणि सीपीजीमध्ये 20.4 टक्के, बीएफएसआय 17.9 टक्के आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 18.3 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली.

शेअर बायबॅक (Share Buyback)

शेअर बायबॅक म्हणजे विद्यमान शेअर धारकांकडून कंपनीचे शेअर पुन्हा विकत घेणे होय. यासाठी कंपनी सद्या मार्केटमध्ये चालू असलेल्या शेअरच्या किमतीपेक्षा अधिक भावाने शेअर्स खरेदी करतात. कंपनीला ज्यावेळेस शेअर बायबॅक करायचे असेल तेव्हा कंपनी सेकंडरी मार्केट मधून शेअर खरेदी करतात.

टीसीएसचा ‘ग्लोबल’ विस्तार

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (टी.सी.एस.) ही 1968 साली स्थापन झालेली माहिती तंत्रज्ञान सेवा, व्यापाराभिमुख प्रणाली सेवा आणि आउटसोर्सिंग सेवा पुरवठा या क्षेत्रात काम करणारी प्रख्यात भारतीय व्यापारी संस्था आहे. ही टाटा उद्योगसमूहातील सर्वाधिक बाजार मुल्यांकन असलेली व्यापारी संस्था आहे. 116,308 कर्मचारी, 47 देशातील कार्यालये आणि 5.7 अब्ज अमेरिकी डॉलर वार्षिक उत्पन्न असलेली टी.सी.एस. ही भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी व्यापारी संस्था आहे.

संबंधित बातम्या

चाहूल अर्थसंकल्पाची: स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ? टॅक्स वाचणार, उत्पन्न वाढणार!

Share Market : सलग चौथ्या दिवशी मार्केटमध्ये तेजी, सेन्सेंक्स 533 अंकांनी वधारला!

शानदार ऑफर! 4.50 लाखांची मारुती कार 2.84 लाखात खरेदीची संधी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI