AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांची घेतली भेट

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर आहेत, त्यांनी आज आपल्या दिल्ली दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यांनी मोदींसोबत 40 मिनिटं चर्चा केली.

सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांची घेतली भेट
सुनेत्रा पवार यांनी घेतली, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 11, 2026 | 5:15 PM
Share

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं, दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यानंतर त्यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारला. उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यानंतर आज सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे,  प्रफुल पटेल, जय पवार आणि पार्थ पवार हे सुद्धा दिल्ली दौऱ्यावर आहेत.

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 40 मिनिटं चर्चा केली, तर अमित शाह यांच्यासोबत अर्धातास चर्चा केली. सुनेत्रा पवा यांनी संसदेतील पंतप्रधान कार्यालयात मोदींची भेट घेतली आहे. एनडीएचा घटक पक्ष म्हणून आम्ही कायम एनसीपी सोबत आहोत अशी ग्वाही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

सुनेत्रा पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, यावेळी सुनेत्रा पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये जवळपास 40 मिनिट बैठक झाली आहे. एनडीएचा घटक पक्ष म्हणून आम्ही कायम एनसीपी सोबत आहोत, तसेच उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना भाजप ठामपणे सोबत राहील असा शब्दही यावेळी नरेंद्र मोदी यांनी सुनेत्रा पवार यांना दिल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्या निधनावर शोक देखील व्यक्त केला आहे.

दरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. मात्र त्यानंतर आता अजित पवार यांच्या अपघातावर शंका उपस्थित करण्यात येत आहे, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून या अपघातावर शंका उपस्थित करत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. रोहित पवार यांनी देखील या अपघातासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...