विनाकारण रेल्वेची साखळी ओढाल, सरकारी नोकरीला मुकाल; वाचा महत्वाचा नियम

रेल्वेने नुकतेच साखळी ओढण्याच्या नियमांत बदल केले आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या अवैध कृती करण्यासाठी सहसा कुणीच धजावत नाही. जर एकापेक्षा अधिक वेळेस साखळी ओढण्याच्या घटनेत दोषी आढळल्यास मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. एवढेच नव्हे तर सरकारी नोकरीलाही मुकावे लागण्याची शक्यता आहे.

विनाकारण रेल्वेची साखळी ओढाल, सरकारी नोकरीला मुकाल; वाचा महत्वाचा नियम
विनाकारण, चुकीच्या कारणासाठी रेल्वे साखळी ओढणे गंभीर गुन्हा

नवी दिल्ली : रेल्वेत विनाकारण अलार्म (Train alarm chain) साखळी ओढणे रेल्वेत कायदेशीर अपराध (legal offence) मानला जातो. अलार्मचा वापर (chain pulling) आपत्कालीन परिस्थितीतच व्हायला हवी. मात्र, विनाकारण अशी कृती करणे प्रवाशांसाठी महागात पडू शकते. रेल्वे (Indian Railway) नियम पुस्तिकेत विनाकारण साखळी ओढणे गंभीर अपराध मानला जातो. दोषी सिद्ध झाल्यास आर्थिक दंडासोबतच अटकेच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते. भविष्यात सरकारी नोकरीला कायमस्वरुपी मुकावे लागेल.

रेल्वेच्या नियमपुस्तिकेत विनाकारण साखळी ओढणे गंभीर गुन्हा असल्याचे म्हटले आहे. प्रवाशांना नेमकी कायद्याविषयी परिपूर्ण जाण नसते आणि अनेकवेळा समान प्रकारची कृती त्यांच्याकडून घडते. रेल्वेचे अनेक मार्ग साखळी ओढण्याच्या घटनांमुळे विख्यात आहेत. साखळी ओढल्यामुळे निर्धारित वेळेपेक्षा रेल्वेला पोहचण्यास उशीर लागू शकतो असे स्पष्ट रेल्वेच्या बोर्डवर स्पष्ट केलेले असते.प्रवासी आपले गाव किंवा भागाच्या समोर रेल्वे थांबवतात. विनातिकीट प्रवासी पोलिसांच्या भीतीने स्टेशन येण्यापूर्वीच रेल्वेची साखळी ओढतात. रेल्वेची वेळ वाया जाते आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. अवैध साखळी ओढण्याने रेल्वेची मोठे नुकसान होते. रेल्वेला मोठा आर्थिक तोटाही सहन करावा लागतो. रेल्वे रुळांवरुन घसरण्याचा मोठा धोकाही असतो.

नेमकं जाणून घेऊया रेल्वेची साखळी ओढणे केव्हा वैध ठरेल-

>> कोणी व्यक्ती किंवा प्रवासाची रेल्वे सुटल्यास

>> रेल्वेत आगीची घटना घडल्यास

>> ज्येष्ठ व्यक्ती किंवा दिव्यांग रेल्वेत चढत असताना रेल्वे निघणे

>> रेल्वेच्या डब्यात कुणाची तब्येत अचानक बिघडल्यास (हृद्यविकाराचा झटका)

>> रेल्वेत हाणामारी, दोन गटांत वाद झाल्यास

वरील कारणांशिवाय रेल्वेची साखळी ओढणे रेल्वे कायदा कलम 141 अंतर्गत गंभीर स्वरुपाचा अपराध मानला जातो. अशा स्थितीत एक हजार रुपयांचा दंड किंवा एक वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे.

साखळी ओढण्याच्या नियमात नुकतेच बदल

रेल्वेने नुकतेच साखळी ओढण्याच्या नियमांत बदल केले आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या अवैध कृती करण्यासाठी सहसा कुणीच धजावत नाही. जर एकापेक्षा अधिक वेळेस साखळी ओढण्याच्या घटनेत दोषी आढळल्यास मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. एवढेच नव्हे तर सरकारी नोकरीलाही मुकावे लागण्याची शक्यता आहे. दोषी व्यक्तीचे नाव डीसीआरबीमध्ये पाठविले जाते. सरकारी नोकरीसाठी आवश्यक असणारे चरित्र प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

साखळी ओढण्याचे ‘विख्यात’ मार्ग

विनाकारण रेल्वेमधील साखळी ओढण्याचे प्रमाण काही मार्गांवर सर्वाधिक आढळते. रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार उत्तरेकडील राज्यांमधील सर्वाधिक मार्ग असल्याचे रेल्वे प्रशासनाला आढळून आले आहे. या सर्व घटनांचा रेल्वेला मोठा फटका बसत असून साखळीला पर्यायी मार्ग शोधत असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.

साखळीला पर्याय वॉकीटॉकी?

साखळीला पर्यायासाठी चालक आणि सहचालकाचा नंबर प्रत्येक डब्यामध्ये लावण्यात येईल. अडचणीमध्ये या नंबरवर प्रवाशांना संपर्क साधता येईल. ‌याशिवाय दर तीन डब्यांमागे एक कर्मचारी वॉकीटॉकीसह रेल्वेच्या डब्यांमधून सातत्याने फिरणार आहे. अडचणीच्या परिस्थितीमध्ये रेल्वे थांबविण्याविषयी सूचना हा कर्मचारी केबिनला देईल. अशाप्रकारे रेल्वे साखळीला मार्ग काढत आहे.

इतर बातम्या :

‘कोरोनाची तिसरी लाट आली, राज्य सरकार, ‘हाफकीन’ने आतातरी जागं व्हावं’, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुनावले खडे बोल

हिवाळ्यात तूप खाण्याचे “हे” आहेत फायदे… अतिलठ्ठपणा अजिबात नाही वाढणार!

Published On - 12:03 am, Fri, 14 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI