हिवाळ्यात तूप खाण्याचे “हे” आहेत फायदे… अतिलठ्ठपणा अजिबात नाही वाढणार!

आपल्या लहानपणापासूनच आजी नेहमी जेवणासोबत तूप खायला हवे, डाळ भातावर तूप खायला पाहिजे असे वारंवार सांगत आलेली आहे परंतु यामागे सुद्धा अनेक कारणे होती. ही करणे काही आपण जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. अनेकांना असे वाटते की तूप खाल्ल्याने वजन वाढते, शरीरामध्ये अति लठ्ठपणा निर्माण होतो, चरबी वाढू लागते आणि यामुळे आपल्या शरीराचा आकार बिघडून जातो, असा गैरसमज तुमच्या मनामध्ये सुद्धा असेल तर तो आजच काढून टाका. आयुर्वेदामध्ये तसेच आहार शास्त्रांमध्ये तूपाचे अनेक फायदे सांगण्यात आलेले आहे, जे आपल्या शरीराच्या जडण घडणीसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.

हिवाळ्यात तूप खाण्याचे "हे" आहेत फायदे... अतिलठ्ठपणा अजिबात नाही वाढणार!
देशी तूप

मुंबई : सध्या प्रत्येक जण आरोग्याच्या दृष्टीने व आपला फिटनेस उत्तम राहावा या दृष्टिकोनातून प्रत्येक अन्नपदार्थ खात असतो. म्हणूनच अशा वेळी आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी निर्माण होऊ नये तसेच शरीराचा आकार (Body Shape) बिघडू नये याकरिता अनेक पदार्थ आपल्या आहारामध्ये समाविष्ट करत नाही त्यातीलच एक पदार्थ म्हणजे तूप (Ghee for health).आपल्यापैकी अनेकांना तूपाचे नाव काढताच अंगावर शहारा येतो आणि त्यांच्या मनामध्ये तूपाविषयी गैरसमज निर्माण झालेले आहे तूप खाल्ल्याने आपले वजन वाढते शरीरावर अतिरिक्त चरबी निर्माण होते, अति लठ्ठपणा होतो, असे अनेक गैरसमज अनेकांनी मनामध्ये रोवून ठेवलेले आहेत. परंतु असे अजिबात होत नाही.

आपल्या आहारामध्ये देखील तूपाचा समावेश केल्याने आपले वजन किंवा आपल्या शरीरावर अतिरिक्त चरबी सुद्धा जमा होत नाही. उलट देशी तूप खाण्याचे खूप सारे फायदे आहेत.आपल्या आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये देशी तुपाला एक सुपरफुड मानले गेलेले आहे तसेच या तुपाच्या अंगी असे अनेक औषधी गुणधर्म असतात जे आपल्या शरीराला मजबुती प्रदान करत असतात. ज्या पद्धतीने लोक आहारामध्ये रिफाइंड तेलाचा वापर करतात ते खर्‍या दृष्टीने आपल्या आरोग्यासाठी घातक आहेत.आज आपण देशी तुपाबद्दल एक अत्यंत महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

देशी तूप खाण्याचे हे आहेत फायदे

कॉमेडियन भारती गेल्या अनेक काळापासून आपल्या वेटलॉस आणि ट्रांसफॉर्मसाठी चर्चेत होत्या त्यानंतर भारती यांनी सांगितले कि, त्यांनी कशा प्रकारे आपल्या वजन कमी केले. त्यांनी सांगितले की या सगळ्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी आहारामध्ये आवर्जून तूपाचा समावेश केला तसेच खाण्यावर वर कुठेच बंदी ठेवली नाही. यामध्ये खरे सत्य आहे की देशी तूपामध्ये फॅटची मात्रा खूपच कमी असते त्याचबरोबर आपली पचनशक्ती सुद्धा नियमितपणे चांगले कार्य पार पाडते. ज्या व्यक्तींना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशा व्यक्तीने जर आपल्या आहारामध्ये देशी तुपाचा समावेश केला तर त्यांचे पोट वेळेवर साफ होते.

तूपाद्वारे शरीराला मिळतात विटामिन्स

तुपामध्ये जे काही फॅट उपलब्ध असतात ज्यामुळे आपल्या शरीराला खूपच फायदा मिळतो ,त्याशिवाय आपले शरीर तंदुरुस्त व मजबूत बनते आपल्या शरीरातील स्नायू व पेशी यांची वाढ व्यवस्थितरीत्या होते तसेच जर तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे विटामिन्सची कमतरता असेल तर हे सगळे विटामिन्स भरून काढण्याची क्षमता देखील तूपामध्ये असते. ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये व्हिटॅमिनची कमतरता आहे अशा व्यक्तीने आपल्या आहारामध्ये तूपाचा अवश्य समावेश करायला हवा तसेच तूप नियमितपणे खाल्ल्याने जर तुम्हाला विटामिन ए ची कमतरता असेल तर ती कमतरता भरून निघते.

बॉडीला बनवते सदृढ

ज्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉलची समस्या सतावत आहे अशा व्यक्तींना तूपापासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो परंतु अशातच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की,आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल पाहायला मिळतात. एक चांगले कोलेस्ट्रॉल आणि एक वाईट कोलेस्ट्रॉल. तूपामध्ये चांगल्या प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते जे आपल्या शरीराला आतून मजबुती व सुदृढ बनवते व त्याचबरोबर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते.

त्वचा बनवते चमकदार

आयुर्वेदिक शास्त्रानुसार तूपामध्ये असे अनेक औषधी घटक उपलब्ध असतात,जे आपल्या चेहऱ्यावरील त्वचा उजळण्यासाठी मदत करतात. तूपामध्ये भरपूर प्रमाणामध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील जे काही विषारी घटक असतात ते निघून जातात तसेच चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे मृतपेशी असतील तर नियमितपणे तूप सेवन केल्याने या मृतपेशी निघून जातात आणि आपली त्वचा अगदी नैसर्गिकरित्या चमकु लागते. जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, वांग, पिंपल्स दूर करायचे असतील तर अशा वेळी रात्री झोपताना चेहऱ्यावर थोडेसे तूप लावून झोपा सकाळी तुम्हाला फरक जाणवेल.

शरीरासाठी आवश्यक असलेले तुपाचे प्रमाण

ज्या व्यक्ती आपले वजन कमी करू इच्छित आहात अशांनी जर आपल्या आहारामध्ये तुपाचा समावेश केला तर यामुळे कोणत्याही प्रकारचा नुकसान होत नाही परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ,आपण तूपाची मात्रा ही मर्यादित ठेवायला हवी तसेच आपण किती मात्रा मध्ये तूप दिवसभरातून सेवन करत आहोत याचे प्रमाण सुद्धा जाणून घेणे गरजेचे आहे. आपल्या सर्वांना एक गोष्ट तर माहिती आहे जर आपण एखादी गोष्ट मर्यादेपेक्षा जास्त केली तरच तीच गोष्ट आपल्यासाठी विपरीत ठरू शकते आणि म्हणूनच कोणतीही गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर ती मर्यादेमध्ये करायला हवी त्याचप्रमाणे तुपाचे सेवन सुद्धा आपण जर मर्यादेपेक्षा जास्त केले तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो आणि म्हणूनच ज्या व्यक्तींना हृदया संदर्भातील समस्या आहेत व अन्य काही आजार असतील अशा व्यक्तींनी आपल्या आहार तज्ञ मंडळी व डॉक्टर यांचा सल्ला घेऊनच तूपाचा समावेश आहारामध्ये करायला हवा.

टिप्स: या लेखामध्ये दिलेली माहिती ही आयुर्वेदिक शास्त्रामध्ये तसेच आहारशास्त्र मध्ये तूपाबद्दल उपयुक्त असलेली माहिती जाणून घेतल्यानंतरच देण्यात आलेली आहे. आम्ही तुम्हाला या लेखात सांगितलेल्या माहितीचा प्रत्यक्ष उपयोग करा असा सल्ला सुद्धा अजिबात देत नाही. जर तुम्हाला या पदार्थाचं सेवन करायचेच असेल तर जवळच्या तुमच्या आहार तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

इतर बातम्या :

शिक्षण इंजिनअरिंगचं धंदा चोरीचा, पोलिसांनी धरलं आणि डॉन व्हायचं राहिलं

Video : बिकानेर एक्स्प्रेला मोठा अपघात! पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचे डबे रुळावरून घसरले

Published On - 11:48 pm, Thu, 13 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI