AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight loss : मांडीवरची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फाॅलो करा !

वाढलेले वजन कमी करण्यासाठी जवळपास प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, वाढलेले वजन कमी करणे सोप्पे काम नाही पण अशक्य असे पण नाही.

Weight loss : मांडीवरची चरबी कमी करण्यासाठी 'या' टिप्स नक्की फाॅलो करा !
मांडीवरची चरबी
| Updated on: May 20, 2021 | 10:31 AM
Share

मुंबई : वाढलेले वजन कमी करण्यासाठी जवळपास प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, वाढलेले वजन कमी करणे सोप्पे काम नाही पण अशक्य असे पण नाही. वजन कमी करण्यासाठी दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत. एक म्हणजे आहार आणि दुसरे म्हणजे व्यायाम या दोन्ही गोष्टी काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. (Follow these tips to reduce thigh fat)

आपल्या शरीरावर सर्वात जास्त चरबी पोट आणि मांडी तयार होते. पोटाच्या चरबीप्रमाणे मांडीवरची चरबी कमी करणे देखील सोपे नाही. मात्र, निरोगी आहार आणि नियमित व्यायामासह आपण मांडीवरची चरबी कमी करू शकतो. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देणार आहोत. ज्यामुळे तुमची मांडीवरची चरबी कमी होण्यास मदत होईल.

स्क्वॅट्स आणि लेझन्स जर आपल्याला फक्त आपल्या मांडीची चरबी कमी करायची असेल तर आपण लेझन्स आणि स्क्वाट्सचे वेगवेगळे प्रकार करू शकतो. स्क्वॅट्स करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या उपकरणांची आवश्यकता नाही. स्क्वॅट्स दररोज 15 ते 30 मिनिटे मांडीला टोन्ड बनवू शकतात. या व्यतिरिक्त आपण एरोबिक आणि सायकलिंग आणि कार्डिओ व्यायाम देखील करू शकता. हे व्यायाम केल्यास मांडीची चरबी कमी होईल.

मीठ खाण्यावर नियंत्रण ठेवा जास्त प्रमाणात मीठाचे सेवन केल्याने शरीरावर सूज येऊ शकते. याशिवाय मीठामुळे तुमचे वजनही वाढू शकते. म्हणून, आपल्या आहारात मीठाचे सेवन कमी करा आणि आपल्या आहारात इलेक्ट्रोलाइट्सचा समावेश करा. इलेक्ट्रोलाइट्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मिश्रित प्रमाणात असतात. एक महिना आहारात मीठाचे सेवन कमी करा बघा तुम्हाला फरक लगेचच जाणवेल.

जास्त पाणी प्या जेंव्हा आपल्याला भूक लागल्यासारखी वाटते. त्यावेळी आपण पाणी पिले पाहिजे. आपण दिवसभरामध्ये जास्तीत-जास्त पाणी पिले पाहिजे. अन्नाच्या ओव्हरराईटिंगमुळे मांडीची चरबी वाढते. हे टाळण्यासाठी, खाण्यापूर्वी भरपूर पाणी प्या. पाणी आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप महत्वाचे आणि चांगले आहे. शरीरात भरपूर प्रमाणात पाणी असेल तर अनेक आजारही आपल्यापासून दूर राहतील.

पुरेशी झोप घ्या  चांगली आणि पुरेशी झोप शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे. आजकाल आपण दिनक्रमात आपण इतके व्यस्त होत चाललो आहोत की स्वतःला शांतीचे दोन क्षणसुद्धा आपण देऊ शकत नाही. मानवी शरीराला कमीत कमी 6 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. पुरेशी झोप न मिळाल्याने थकवा जाणवणे तसेच एकाग्रता कमी होते. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी झोप सर्वात महत्वाची आहे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Follow these tips to reduce thigh fat)

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप