AI Police Station : आता AI लिहिणार FIR? इथे उभं राहणार देशातील पहिलं AI पोलीस स्टेशन
AI चा वापर फोटो तयार करण्यासाठी होतो हे आजपर्यंत आपण ऐकलं होतं, फार फार तर व्हिडिओ बनवण्यासाठी पण तुम्ही कधी AI ला पोलीस स्टेशन सांभाळताना पाहिलयं का? या ठिकाणी उभ राहतंय देशातील पहिल AI पोलीस स्टेशन

आजकाल AI चा वापर करून फोटो तयार करण्यापासून ते मोठंमोठी काम करण्यापर्यंत AI चा वापर केला जातो. पण आता याच AI ची एन्ट्री पोलिस ठाण्यातही होणार आहे. एखादी तक्रार नोंदवयाची असेल आणि स्थानिक भाषा येत नसेल, तर नेमकं काय करायचं, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र आता भाषेची ही अडचण दूर करण्यासाठी हैदराबादमध्ये एक अनोखा प्रयोग सुरू करण्यात येणार आहे. इथलं पंजागुट्टा पोलीस ठाणं देशातील पहिलं AI आधारित पोलीस स्टेशन बनण्यात येत आहे.
या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यापासून ते तपासाशी संबंधित कागदपत्रं तयार करण्यापर्यंत अनेक कामांमध्ये AIची मदत घेतली जाणार आहे. हैद्रबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी पोलीस ठाण्याची पाहणी केली असून, डिसेंबर 2026 च्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे.
या ठाण्यातील सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सेतू नावाचं स्मार्ट किऑस्क. हे किऑस्क पोलीस ठाण्याच्या स्वागत कक्षात बसवण्यात आलं आहे. त्याच्या माध्यमातून नागिरकांना जवळपास 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये आपली तक्रार नोंदवता येणार आहे. AI ही तक्रार स्थानिक भाषेत अनुवादित करून संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवेल. त्यामुळे भाषेमुळे तक्रार मांडताना येणारी अडचण कमी होण्यास मदत होणार आहे.
फक्त तक्रार नोदंवणं एवढचं काम AI चं नसेल तर FIR नोंदवणे, केस डायरी तयार करणे,अहवाल लिहिणे आणि चार्जशिट तयार करण्यासाठीही AI ची मदत होणार आहे. त्यामुळे पोलिंसांना कागदपत्र तयार करण्यातील वेळ आणि कामाच ताण कमी करण्याच प्रयत्न आहे.
याशिवाय परिसरातील गुन्ह्यांची नोंद, वाहतूक कोंडी, वसतिगृह आणि व्यावसायिक इमारतींशी संबंधित माहितीचं विश्लेषणही AI करणार आहे. या माहितीच्या आधारे कोणत्या भागात आणि कोणत्या वेळी पोलिसांची गस्त वाढवण्याची गरज आहे. हे ठरवण्यास मदत होईल. ब्लू कोल्टस पथकांची तैनाती अधिक प्रभावी करण्याचाही यामागे उद्देश आहे.
