हिळ्यात ‘हा’ हलवा म्हणजे आरोग्यासाठी मोठं वरदान, अत्यंत पौष्टिक आणि सौंदर्यासाठीही उत्तम
हिवाळ्यात अनेक समस्या डोकंवर काढतात, अशात अनेकांची प्रकृती देखील खालावते. म्हणून हिवाळ्यात काही पदार्थ बनवले जातात, ज्यामुळे आरोग्य स्थिर राहतं... तर हिवळ्यात 'अक्रोडचा हलवा' उत्तम पर्याय आहे... तर जाणून घ्या कसा बनवायचा 'अक्रोडचा हलवा'

आता हिवाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत आणि थंडी देखील जाणवू लागली आहे. अशात हिवाळ्याच्या दिवसांत शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आणि ऊर्जा मिळवण्यासाठी अक्रोड हलवा (Walnut Halwa) हा एक उत्तम आणि पौष्टिक पदार्थ आहे. अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, जे थंडीच्या दिवसांत मेंदू आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. अक्रोडचा हलवा’ हा एक उत्तम गोड पदार्थ आहे. हा केवळ चवीलाच स्वादिष्ट नाही, तर तुम्हाला निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठीही खूप प्रभावी आहे.
आपण सर्वजण अक्रोडला ‘मेंदूसाठी पोषक अन्न’ म्हणून ओळखतो. पण अनेकांना माहिती नाही की, ते तुमच्या मेंदू, त्वचा, केस आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, अँटीऑक्सिडंट्स, प्रथिने आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. तूप आणि दुधापासून बनवलेला हा हलवा हिवाळ्यातील कोरडेपणा दूर करून चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणतो. एवढंच नाही तर, तो शरीराला थंडीशी लढण्यासाठी त्वरित ऊर्जा आणि शक्ती देतो, तसेच सांधेदुखी आणि थकव्यापासून आरामही देतो.
हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
अक्रोड: 1.5 कप (रात्रभर भिजवून साल काढलेले), फुल क्रीम दूध: 3 कप, देशी तूप: 5 ते 7 मोठे चमचे, गूळ किंवा साखर: 1 कप (चवीनुसार), वेलची पूड: अर्धा चमचा, केशर: 8 ते 10 काड्या सजावटीसाठी तुम्हाला कापलेला सुका मेवा म्हणजे बदाम आणि काजू… हे सर्व साहित्य तुम्ही आधी एकत्र करा…
अक्रोड हलवा कसा बनवायचा?
सर्वप्रथम, रात्रभर भिजवलेले अक्रोड सोलून घ्या. आता ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा आणि ती म्हणजे, तुम्हाला अगदी बारीक आणि गुळगुळीत पेस्ट बनवायची नाही, त्यात थोडासा पोत तसाच राहिला पाहिजे. आता गॅसवर एक जाड भांडं ठेवा आणि त्यात साजूक तूप गरम करा. तूप गरम झाल्यावर लगेच त्यात वाटलेले अक्रोड घाला आणि मंद आचेवर सतत ढवळत भाजून घ्या.
जेव्हा त्यांचा रंग हलका सोनेरी होईल आणि छान सुगंध येऊ लागेल, तेव्हा समजावे की अक्रोड भाजले आहेत. आता या मिश्रणात हळूहळू दूध घाला आणि सतत ढवळत राहा, जेणेकरून त्यात गुठळ्या होणार नाहीत. मध्यम आचेवर शिजू द्या. जेव्हा दूध थोडं घट्ट होऊ लागेल, तेव्हा आपल्या आवडीनुसार त्यात गूळ किंवा साखर घाला. हिवाळ्यात गूळ वापरल्याने हा हलवा अधिक फायदेशीर आणि आरोग्यदायी बनतो.शेवटी वेलची आणि केशर घालून चांगलं मिसळा. हलवा कढईच्या कडा सोडू लागेपर्यंत शिजवा. गॅस बंद करा आणि कापलेल्या काजू व बदामांनी सजवा.
अक्रोड हलवा खाण्याचे आश्चर्यकारक फायदे
हलव्यामुळे थंडीच्या दिवसात शरीर आतून उबदार राहतं. आणि त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. एवढंच नाही तर, रोगांशी लढण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती मजबूत करते. हलवा आपल्या मेंदू तसेच हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. हलवा त्वरित ऊर्जा देते, हिवाळ्यातील अशक्तपणा आणि थकवा दूर करतं.
