Panda Viral Video: पांडाच्या पिंजऱ्यात पडली मुलगी, तो जवळ आला अन्…; घटनेचा Video Viral
Viral Video: प्राणीसंग्रहालयात पांडा पाहण्यासाठी आलेली एक चिमुकली अचानक पांडांच्या पिंजऱ्यात पडली. त्यानंतर जे घडले ते व्हिडीओमध्ये कैद झाले आहे.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येणार नाही. असाच एक व्हिडीओ काही तासांपासून तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे पांडा आणि एका छोट्या मुलीचा. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक छोटी मुलगी अचानक पंड्याच्या पिंजऱ्यात पडलेली दिसली. काही क्षणातच तिकडे एक पांडा आला. वरून बघत असलेले सगळे लोक फार घाबरले. आता तो पांडा त्या चिमुकलीला काय करेल? काही इजा करेल का? असं सगळ्यांना वाटलं. पण व्हिडीओमध्ये दुसरंच काही बघायला मिळालं. ज्याचा लोकांनी विचारही नसेल केला. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.
पांडा जवळ आला अन्…
ती मुलगी पडल्यावर काही क्षणातच तिकडे एक पांडा येतो आणि तिला उचलतो. काही वेळातच दुसरा पांडा तिकडे येतो. तो पांडा खाली झोपतो आणि त्यावर मुलीला उचलून उभा असलेला पांडा उभा राहतो. त्या मुलीला तो पांडा पुन्हा तिच्या पालकांकडे देतो. हा सुंदर क्षणामुळेच, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
https://t.co/Nme6e8dRVT
— Shahid Chaudhary (@Fani2536) November 12, 2026
अचानक कशी पडली ती मुलगी?
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये प्राणीसंग्रहालयासारखी एक जागा दिसते, जिथे लोक पांडा पाहण्यासाठी जमले आहेत. अचानक, पिवळ्या रंगाचे कपडे घातलेली एक लहान मुलगी त्या बंदिस्त जागेत पडते. हे पाहून जवळ उभे असलेले लोक घाबरतात. कारण पांडा दिसायला शांत आणि गोंडस वाटत असले, तरी प्रत्यक्षात ते वन्य प्राणी आहेत. त्यामुळे, त्यांच्यामध्ये एखादे लहान मूल जाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. व्हिडिओमध्ये, मुलगी खाली पडताच तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचे लक्ष लगेच तिच्याकडे जाते.
युजर्सच्या प्रतिक्रिया काय?
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, सोशल मीडियावर लोकांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही युजर्सनी पांडाच्या वर्तनाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे, तर काहींनी असे म्हटले आहे की, प्राण्यांचे वर्तन अनेकदा आपण अपेक्षेपेक्षा वेगळे असू शकते. दरम्यान, काही वापरकर्त्यांनी या व्हिडीओच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, तो एआय (AI) द्वारे तयार केलेला असू शकतो, अशी शक्यता वर्तवली आहे. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर व्हायरल क्लिप्सच्या सत्यतेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
