AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mutton : मटण खरेदी करताना केलेली ‘ही’ चुक ठरू शकते धोकादायक; तुम्हीदेखील करता का?

मांसाहारी लोकांमध्ये मटण आणि रस्सा हे अत्यंत आवडीच्या पदार्थांपैकी एक आहे. अशात खवैय्ये घरच्याघरीच चमचमीत मटण करतात, मात्र अनेकदा असं पाहायला मिळतं की मटण खाल्यानंतर तब्येत बिघडते किंवा पोटदुखीसारखे त्रास उद्भवतात. याची काही महत्त्वाची कारणे समोर आली आहेत. त्यामुळे मटण खरेदी करताना या चुका टाळल्यास ते आरोग्यासाठी काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकतात.

| Updated on: Nov 14, 2026 | 7:01 PM
Share
चांगले मटण नेहमीच हलके लाल किंवा गुलाबी असते. जर त्याचा रंग खूप गडद लाल किंवा तपकिरी दिसत असेल तर ते शिळे आहे किंवा बऱ्याच वेळापासून उघड्यावर साठवल्याचे समजते. ताजे मटण नेहमीच थोडे चमकदार दिसते आणि शिळे मटण सामान्यतः निस्तेज असते.

1 / 6
ताज्या मटणाचा सुगंध जरा सौम्य आणि ताजा असतो. जर मटणाचा वास उग्र किंवा आंबट असेल तर ते खराब झाले असल्याची शंका असते. खराब झालेल्या मटणाला तीव्र आणि अनैसर्गिक वास येतो.

ताज्या मटणाचा सुगंध जरा सौम्य आणि ताजा असतो. जर मटणाचा वास उग्र किंवा आंबट असेल तर ते खराब झाले असल्याची शंका असते. खराब झालेल्या मटणाला तीव्र आणि अनैसर्गिक वास येतो.

2 / 6
मटण खरेदी करताना कधीही त्यावर हलक्या हाताने दाब द्यावा, जर ते लगेच दाबले जात असेल तसेच हाताला मऊ लागत असेल तर ते ताजे आहे. परंतु, जर दाब दिल्यावर त्यावर बोटाचा ठसा उमटला किंवा पाण्यासारखा द्रव बाहेर पडला तर ते खराब झाले असे समजावे.

3 / 6
चांगल्या मटणातील चरबी बहुतांश पांढरी आणि गुळगुळीत असते. जर चरबी पिवळी किंवा कडक दिसत असेल तर ते मटण शीळे असते. ताज्या मटणातील चरबी सहजपणे कापली जाते आणि थोडी मऊ असते. बऱ्याचदा विक्रेते मटण चमकदार दिसण्यासाठी रसायने किंवा रंग वापरतात. असे मटण ताजे दिसू शकते पण प्रत्यक्षात खराब असते. जर तुम्हाला मटणावर अनैसर्गिक चमक किंवा तेलकटपणा दिसला तर ते पूर्णपणे टाळा.

4 / 6
नेहमी स्वच्छ ठिकाणाहून आणि स्वच्छ असलेले मटण खरेदी करा. दुकान माश्या किंवा वासांपासून मुक्त असावे. ताजे मटण नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये किंवा थंड ठिकाणी ठेवावे. जर तुम्ही सुपरमार्केटमधून पॅकेटमधले  मटण खरेदी करत असाल, तर त्यावरील  आणि एक्सपायरी डेट तपासा. पॅकेजमध्ये बर्फाचे स्फटिक किंवा गळती नाही याची खात्री करा.

5 / 6
काहीजण सवलतीमुळे जास्त मटण खरेदी करण्याची चूक करतात.मात्र हे अत्यांत चुकीचे आहे. जास्त काळ साठवलेले मटण चव आणि पोषण दोन्ही गमावते. म्हणून, तुम्हाला जेवढे आवश्यक आहे तेवढेच खरेदी करा. मटण बनवण्यापूर्वी थंड पाण्यात चांगले धुवा आणि शिजवण्यापूर्वी ते व्हिनेगर किंवा लिंबाच्या रसात थोडा वेळ भिजवा. यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतील आणि मटण अधिक स्वादिष्ट होईल.

6 / 6
Follow Us
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद, VIDEO व्हायरल
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..
Pune Case : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने रद्द!