AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD weather update : पुढील 48 धोक्याचे, 16 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्राबाबतही मोठी अपडेट

हवामानामध्ये अचानक मोठा बदल झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, आता तिसऱ्या चक्रीवादळाची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

IMD weather update : पुढील 48 धोक्याचे, 16 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्राबाबतही मोठी अपडेट
IMD weather updateImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 14, 2026 | 6:42 PM
Share

देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 15 नोव्हेंबर रोजी रविवारी 16 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) कडून देण्यात आला आहे. याच काळात 40 ते 90 किलोमीटर प्रति तास एवढ्या प्रचंड वेगाने वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचच रुपांतर पुढील 48 तासांमध्ये चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दक्षिण भारतामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

अचानक वातावरणात झालेल्या या बदलामुळे पुढील 24 तासांमध्ये हिमालय क्षेत्रांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, काही ठिकाणी बर्फवृष्टीचा देखील अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मैदानी प्रदेशात देखील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे, तर उत्तर भारतामध्ये दाट धुक्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

या राज्यांमध्ये पावसाचा इशारा

जम्मू -काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, यासह दक्षिण भारतामधील काही राज्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

दरम्यान महाराष्ट्रात हवामान विभागाकडून कोणताही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाहीये. महाराष्ट्रात बहुतांश भागात हवामान कोरडं राहणार असून, थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर काही भागात दिवसा उन्हाचा कडका देखील वाढणार आहे.

उत्तर भारतामध्ये दाट धुक्याची शक्यता दरम्यान दुसरीकडे उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराख या भागांमध्ये या काळात दाट धुक्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस असंच वातावरण राहणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर मात्र महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद, VIDEO व्हायरल
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..
Pune Case : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने रद्द!