चिनी हेरच्या हनीट्रॅपमध्ये अडकलेले जेन्सेन हुआंग हातात कधीच घड्याळ का घालत नाहीत? कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
जेन्सेन हुआंग हे Nvidia या कंपनीचे सीईओ होते. ॲलिस हुआंग या महिलेशी असलेल्या विवाहबाह्य संबंधांमुळे ते चांगलेच चर्चेत आले. मात्र ही महिला आता चिनी हेर असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान जेन्सेन हुआंग हे कधीही आपल्या हातात घड्याळ घालत नाहीत.

Nvidia चे सीईओ जेन्सेन हुआंग यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जेन्सेन यांचं वेळेबाबत आपलं एक वेगळंच गणित आहे. जेन्सेन हुआंग हे आपल्या हातात कधीच घड्याळ घालत नाहीत. त्यांना हातात घड्याळ घालायला आवडत नाही, म्हणून ते हातात घड्याळ घालत नाहीत, असं काहीही नाहीये. तर त्यामागे एक स्पेशल कारण आहे. जेन्सेन हुआंग यांच्या मते वर्तमान कळात सध्या जो क्षण सुरू आहे, तो सर्वात महत्त्वाच आहे. ते कधीच वेळेची मर्यादा किंवा भविष्यातील गोष्टींबद्दल विचार करत नाहीत, ते फक्त आता सध्या या क्षणाला वर्तमान काळात काय सुरू आहे, तेवढाच विचार करतात.
जेन्सेन यांना माळ्याकडून मिळाला धडा
एका रिपोर्ट्सनुसार एकदा जेन्सेन यांनी क्योटोमध्ये एका माळ्याला एका मोठ्या मंदिरातील बागेमध्ये काम करताना पाहिले. प्रचंड उन्हातही हा माळी काळजीपूर्वक बागेमध्ये काम करत होता. तेव्हा जेन्सेन यांना असा प्रश्न पडला की, एवढ्या प्रचंड उन्हात देखील हा माळी एवढ्या एकाग्र चित्ताने एवढ्या मोठ्या बागेची देखभाल एकटा कशी करू शकतो? तेव्हा त्यांनी याबाबत माळ्याला विचारलं, तेव्हा माळ्याने त्यांना उत्तर दिलं की माझ्याकडे खूप वेळ आहे. तेव्हा माळ्याच्या बोलण्यातून त्यांना हा धडा मिळाला की, जेव्हा तुम्ही एखादं काम हातात घेता, तेव्हा कधीही वेळेचा विचार करू नका, जोपर्यंत ते काम यशस्वी होत नाही, तोपर्यंत तुमचा सगळा फोकस त्या एकाच कामावर केंद्रीय करा, तेव्हापासून वेळेचं प्रतिक असलेलं घड्याळ हातात घालणं त्यांनी सोडून दिलं.
कोण आहेत जेन्सेन हुआंग?
जेन्सेन हुआंग हे Nvidia या कंपनीचे सीईओ होते. त्यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1963 मध्ये तैवान येथे झाला. त्यांनी 1993 मध्ये Nvidia नावाच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीची स्थापना केली. एआय आणि गेमिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या जीपीयू (GPUs)चीप निर्मिती क्षेत्रात त्यांचं फार मोठं योगदान आहे. परंतु ॲलिस हुआंग या महिलेशी असलेल्या विवाहबाह्य संबंधांमुळे ते चांगलेच चर्चेत आले. ही महिला चिनी गुप्त हेर असल्याचा तिच्यावर आरोप आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
