Venus Transit: उद्यापासून या 2 राशींसाठी काळ कठीण, शुक्र मार्गी होताच वाढतील अडचणी
Shukra Margi Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार, 14 नोव्हेंबर रोजी शुक्र ग्रह मार्गी होणार आहे. शुक्राच्या या स्थितीबदलाचा काही राशींवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असून, दोन राशींच्या अडचणी वाढू शकतात. कोणत्या आहेत या राशी आणि त्यांना कोणत्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल, जाणून घेऊया.

ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सुख, समृद्धी, प्रेम, वैवाहिक जीवन आणि ऐश्वर्याचा कारक मानले जाते. त्यामुळे शुक्राच्या स्थितीत होणाऱ्या बदलांचा परिणाम राशींवरही होत असल्याचे मानले जाते. ३ ऑक्टोबरपासून शुक्र कन्या राशीत वक्री अवस्थेत असून, १४ नोव्हेंबर २०२६ पासून तो पुन्हा मार्गी होणार आहे. ज्योतिषाचार्यांच्या मते, शुक्राची ही बदललेली चाल बहुतांश राशींसाठी अनुकूल ठरू शकते. मात्र, धनु आणि मीन या दोन राशींना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक व्यवहार, नातेसंबंध आणि महत्त्वाचे निर्णय घेताना या राशींनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चला तर जाणून घेऊया, शुक्राच्या मार्गी होण्याचा धनु आणि मीन राशीवर नेमका काय परिणाम होऊ शकतो. धनु राशी शुक्र मार्गी झाल्यानंतर धनु राशीच्या लोकांना आर्थिक आणि वैयक्तिक आयुष्यात काही अडचणी येऊ शकतात. अचानक एखाद्या कामासाठी मोठा खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे पैशांचे व्यवहार करताना घाई न करता विचारपूर्वक निर्णय घ्या. नातेसंबंधांमध्येही मतभेद होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत छोट्या कारणांवरून वाद होऊ शकतात. अशा वेळी संयम राखणे महत्त्वाचे ठरेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात. त्यामुळे इतर गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी शुक्राची मार्गी चाल काही बाबतीत आव्हानात्मक ठरू शकते. एखाद्या कामात अपेक्षित यश मिळण्यास विलंब होऊ शकतो. इच्छित परिणाम मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळणे आणि कोणताही व्यवहार घाईघाईने न करणे हिताचे ठरेल. जोडीदारासोबत वाद झाल्यास जुन्या गोष्टी पुन्हा उकरून काढू नका. त्यामुळे छोट्या वादाचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊ शकते. आरोग्याकडे लक्ष द्या. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्याचे परिणाम नीट समजून घ्या. शुक्राची कृपा मिळवण्यासाठी काय करावे? ज्योतिषीय मान्यतेनुसार, शुक्राच्या या काळात काही धार्मिक उपाय केल्याने दिलासा मिळू शकतो. प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसेच पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करावे. दररोज ‘ॐ शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा १०८ वेळा जप करण्याचाही सल्ला दिला जातो. घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. महिलांचा अपमान करू नका आणि कोणाशीही अपमानास्पद बोलणे टाळा.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)
