SpiceJet Airlines : मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडाचा भारतीय विमान सेवांना फटका! स्पाईसजेटची उड्डाणे रद्द
मायक्रोसॉफ्टच्या जागतिक स्तरावरील सेवांमध्ये झालेल्या बिघाडामुळे भारतातील काही विमान कंपन्यांच्या ग्राहकसेवा व्यवस्थेत अडचणी निर्माण झाल्या. काही विमानं रद्द करण्यात आली, तर काहींचे उड्डाण उशीराने होत आहे. जाणून घ्या सविस्तर

मायक्रोसॉफ्टच्या सेवांमध्ये तांत्रिक बिघाड झाला की त्याचा परिणाम फक्त ई -मेल पुरता मर्यादित राहत नाही. हे आपल्याला कळून आलेच आहे. मायक्रोसॉफ्टच्या जागतिक स्तरावरील सेवांमध्ये झालेल्या बिघाडामुळे भारतातील काही विमान कंपन्यांच्या ग्राहकसेवा व्यवस्थेत अडचणी निर्माण झाल्या. याचदरम्यान दिल्ली विमानतळावर स्पाईसजेटच्या काही उड्डाणांबाबत प्रवाशांना सतर्क करण्यात आलं. 13 नोव्हेंबर रोजी दिल्लीहून जाणारी स्पाईसजेटची तीन उड्डाण रद्द करण्यात आली तर दोन उड्डाणांना उशीर झाला.
मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीहून पुणे, लेह आणि मुंबईला जाणारी स्पाईसजेटची तीन उड्डाणं रद्द झाली. यामध्ये एसजी 186 दिल्ली पुणे ) एसजी 123 (दिल्ली – लेह ) आणि एसजी 476 ( दिल्ली- मुंबई ) या विमानांचा समावेश होता. याशिवाय दिल्लीहून दरभंगाला जाणाऱ्या एसजी 2495 आणि मुंबईला जाणाऱ्या एसजी 671 या दोन उड्डाणांनाही उशीर झाला.
Passenger Advisory issued at 15:55 hrs. For Live flight status: https://t.co/1CVJNL6Ry1 #DelhiAirport #PassengerAdvisory #DELAdvisory https://t.co/HRLTTKot8t
— Delhi Airport (@DelhiAirport) November 13, 2026
दरम्यान दिल्ली विमानतळाने प्रवाशांसाठी ही सूचना जारी केली आहे. स्पाईसजेटच्या परिचालनविषयक अडचणींमुळे काही उड्डाणांवर परिणाम होऊ शकतो. असं विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केलं. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी आपल्या उड्डाणाची सद्यस्थिती तपासावी आणि अधित माहितीसाठी थेट स्पाईसजेटशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
#ImportantUpdate: We are currently experiencing intermittent connectivity issues with our SpiceJet Customer Care helpline numbers. We assure you that our relevant teams are working to resolve this as soon as possible. In the meantime, please connect with us through our official social media channels. We will be glad to assist you. Stay tuned for further updates. We regret the inconvenience caused.
— SpiceJet (@flyspicejet) November 10, 2026
अकासा एअरलाईनेही ई- मेल सेवेत विलंब होण्याची शक्यता असल्याची सूचना दिली. तर एअर इंडियाने दिलासा देताना आपल्या विमानाचं वेळापत्रक आणि उड्डाणांवर या तांत्रिक बिघाडाचा परिणाम झालेलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. प्रवाशांचे ई मेल व्यवस्थित मिळावेत यासाठी कंपनीने ई-मेलचा मार्ग तात्पुरता बदलल्याची माहितीही दि
मायक्रोसॉफ्टच्या आऊटलूक, टीम्स आणि मायक्रोसॉफ्ट 365 यांसारख्या सेवांमध्ये 12 नोव्हेंबरपासून तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. कंपनीने या समस्येवर उपाययोजना सुरू केल्या होत्या. मात्र विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या घटनेने एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित केली आहे. विमानतळावर जाण्यापूर्वी केवळ ई- मेल किंवा मेसेजवर अवलंबून न राहता थेट विमान कंपनीकडून उड्डाणाची स्थिती तपासणं आवश्यक आहे.
