Maharashtra Earthquake: सकाळी सकाळीच जळगाव, बुलढाणा जिल्ह्यात जमीन हादरली, रिश्टर स्केलवर 4.5 तीव्रतेची नोंद, भूकंपाचे केंद्र बिंदू कुठे?
Jalgaon Buldhana Earthquake: जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि रावेरपाठोपाठ बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातही आज सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद झाली.

जळगाव, बुलढाणा जिल्ह्याला भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 4.5 तीव्रतेची नोंद
Jalgaon Buldhana Earthquake: जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि रावेरपाठोपाठ बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातही आज सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. सकाळी ९ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास हा धक्का बसला असून, अनेक नागरिकांच्या घरातील साहित्य हलल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या भूकंपाचा केंद्रबिंदू मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात असून, तेथे ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद झाली आहे. सुदैवाने मलकापूर तालुक्यात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती नाही. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बातमी अपडेट होत आहे…
Follow Us
