AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranbir Kapoor: ते माझ्यासमोर ढसाढसा रडू लागले पण मी..; ऋषी कपूर यांच्याबद्दल बोलताना रणबीर भावूक

Ranbir Kapoor: वडिलांच्या निधनाच्या अनेक वर्षांनंतरही वडिलांच्या आठवणी आणि त्यांच्यासोबतच्या नात्यातील अपूर्ण राहिलेल्या भावना रणबीरच्या मनात कायम असल्याचं त्याच्या या वक्तव्यातून स्पष्ट होतं.

Ranbir Kapoor: ते माझ्यासमोर ढसाढसा रडू लागले पण मी..; ऋषी कपूर यांच्याबद्दल बोलताना रणबीर भावूक
Ranbir Kapoor and Rishi KapoorImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 14, 2026 | 10:51 AM
Share

Ranbir Kapoor: अभिनेता रणबीर कपूर त्याच्या दमदार अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र, यावेळी तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केलेल्या एका भावनिक खुलाशामुळे चर्चेत आला आहे. रणबीरने एका मुलाखतीत वडील आणि ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला. वडिलांच्या निधनाच्या वेळी मी रडलो नव्हतो, असं सांगतानाच त्याने मनात आजही असलेल्या अपराधीपणाच्या भावनेबद्दलही भाष्य केलं. वडिलांसोबतचं नातं, त्यांच्यातील भावनिक अंतर आणि शेवटच्या दिवसांमध्ये व्यक्त न करू शकलेलं प्रेम याबद्दल बोलताना रणबीर भावूक झाला.

‘बाबा वारले तेव्हा मी रडलो नाही…’

ऋषी कपूर यांच्या निधनाचा दिवस आठवताना रणबीर म्हणाला की, डॉक्टरांनी कुटुंबीयांना आधीच सांगितलं होतं की, ही त्यांची शेवटची रात्र असू शकते. त्यांचे प्राण कधीही जाऊ शकतात, अशी परिस्थिती होती. त्यावेळी वडिलांच्या खोलीजवळ गेल्यानंतर रणबीरला पॅनिक अटॅक आला होता. नेमकं काय घडत आहे आणि या परिस्थितीत स्वतःला कसं व्यक्त करावं, हेच त्याला समजत नव्हतं. विशेष म्हणजे, वडिलांचं निधन झाल्यानंतरही त्याला रडू आलं नाही. त्या दुःखाला सामोरं जाणं त्याच्यासाठी अत्यंत कठीण होतं. आपण गमावलेली व्यक्ती नेमकी किती महत्त्वाची होती, याची जाणीव आजही पूर्णपणे झालेली नाही, असं रणबीरने सांगितलं. वडिलांच्या जाण्याच्या वेळी मनात अनेक भावना होत्या, पण त्यांना व्यक्त करता आलं नाही, याची खंत त्याला आजही वाटते.

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Dip Bappi (@dipbappimusic)

वडिलांना मिठी मारू शकलो नाही, याची खंत!

रणबीरने मुलाखतीत ऋषी कपूर यांच्या उपचारांदरम्यान घडलेला एक प्रसंगही सांगितला. एकदा ऋषी कपूर त्याच्या खोलीत आले आणि त्याच्यासमोर रडू लागले. वडिलांनी आपली कमकुवत बाजू यापूर्वी कधीही त्याच्यासमोर दाखवली नव्हती. त्यामुळे त्यांना अशा अवस्थेत पाहून रणबीरला नेमकं काय करावं, हेच समजत नव्हतं. त्यांनी आपल्याला मिठी मारावी का, त्यांचं सांत्वन कसं करावं, याबद्दल तो गोंधळलेला होता. या प्रसंगात त्याला वडील आणि स्वतःमधील भावनिक अंतर प्रकर्षाने जाणवलं. त्यांच्यातील दुरावा बाजूला ठेवून त्यांना सहजपणे स्वीकारता आलं नाही, याची खंत त्याने व्यक्त केली.

‘माझ्या मनात आजही अपराधीपणाची भावना’

वडिलांना मिठी मारून त्यांच्याप्रती असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण पुढाकार घेतला नाही, याचं रणबीरला आजही दुःख आहे. त्या क्षणी त्यांना भावनिक आधार देता आला असता, पण तसं घडलं नाही. त्यामुळे मनात अपराधीपणाची भावना असल्याचं त्याने सांगितलं. ऋषी कपूर यांचं 30 एप्रिल 2020 रोजी कर्करोगाच्या उपचारादरम्यान निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण कपूर कुटुंबासह बॉलिवूडवर शोककळा पसरली होती.

Follow Us
CEO जेन्सन हुआंग यांच्यावर चिनी महिलेचा हनी ट्रॅप? नेमकं प्रकरण काय?
Jensen Huang : CEO जेन्सन हुआंग यांच्यावर चिनी महिलेचा हनी ट्रॅप? नेमकं प्रकरण काय?
जळगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, मुक्ताईनगर-रावेरमध्ये सकाळी 9.16..
Jalgaon : जळगाव जिल्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, मुक्ताईनगर-रावेरमध्ये सकाळी 9.16 वाजता जमीन थरथरली; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम....
Pune : पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम चित्रपटाच्या शूटिंगवरून नवा वाद
करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली
Karuna Munde : करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? हर्षवर्धन सपकाळ यांची घेतली भेट; चर्चांना उधाण
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं?
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं? मुंबई महापालिकेतील बैठकीवरून नवा राजकीय वाद
राज ठाकरे काहीही करा, छठपूजा थांबणार नाही; सदावर्तेंचं थेट आव्हान...
Gunaratna Sadavarte On Raj Thackeray : राज ठाकरे काहीही करा, छठपूजा थांबणार नाही; सदावर्तेंचं थेट आव्हान
दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा..
NCP : दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, मुंबईत सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा; राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय?
पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि....
Pune-Solapur Highway : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि प्रवासी जखमी; वाहतुकीचा खोळंबा
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?