Pune Vaishali And Rupali Hotels : तुकाराम मुंढेंच्या FDA ने पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रुपाली हॉटेलला दिला दणका
Pune Vaishali And Rupali Hotels : FDA कडून सध्या अन्न सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टारंट विरोधात कारवाई सुरु आहे. डॉमिनोज पिझ्झा असो किंवा KFC कुठल्याही नामांकित आऊटलेटला मुंढे यांच्या FDA ने सोडलेलं नाही.

महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रूपाली हॉटेलला दणका दिला आहे. FDA कडून या दोन्ही हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. स्वयंपाकघरातील अस्वच्छता, उघड्यावर अन्नपदार्थांची साठवणूक आणि अन्नसुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे FDA कडून ही कारवाई करण्यात आलीय. तपासणीत हॉटेल वैशालीला 98 पैकी केवळ 58 गुण मिळाले. यापूर्वी नोटीस देऊनही त्रुटी कायम असल्याने वैशाली हॉटेलवर कारवाई करण्यात आली.
रूपाली रेस्टॉरंटमध्येही अस्वच्छता, अयोग्य अन्नसाठवणूक आणि आवश्यक कागदपत्रांचा अभाव होता. दोन्ही हॉटेल्सचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. परवाने पूर्ववत होईपर्यंत विक्री, पार्सल आणि होम डिलिव्हरीवर बंदी घालण्यात आली आहे. पुण्यातील एफ.सी.रोडवर असलेली ही दोन्ही हॉटेल्स प्रसिद्ध आहेत. त्यांना FDA कडून दणका देण्यात आला आहे.
(बातमी अपडेट होत आहे)
