AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान, म्हणाल्या, माझा भाऊ..

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच आता सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मोठे विधान केले. हेच नाही तर त्यांनी विलिनीकरणावर भाष्य केले.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान, म्हणाल्या, माझा भाऊ..
Supriya Sule
| Updated on: Nov 14, 2026 | 11:15 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. विलिनीकरणासंदर्भात वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. 12 फेब्रुवारी रोजीच दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं असतं, असा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला होता. सुनील तटकरे यांच्या या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळातून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. सतत ही चर्चा रंगताना दिसत असतानाच आता सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, तुम्हाला या विलीनीकरणाच्या गोष्टींचा कंटाळा आला नसेल पण मला कंटाळा आलेला आहे. या विषयावर मी यापुढे बोलणार नाही. दादा आणि आमच्या नेत्यांचे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची विलीनीकरणावर चर्चा झाली होती. तारीख ठरली होती हे सत्य आहे.

माझा भाऊ दादा गेला त्यानंतर या चर्चांना आमच्याकडून पूर्णविराम दिलेला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून काय चर्चा होतात त्यांच्याशी आमचे देणे घेणे नाही. आम्ही त्यांच्या प्रतिक्रियांवर काहीही बोलत नाही. माझ आणि माझ्या भावाच नात जवळच होत तो ओलावा कायम राहील. आमच्या नेत्यांशी ही चर्चा होते तर त्यात चुकीच काय..

महागाई, दुष्काळ, पॉलिसी मेकिंग अश्या अनेक गोष्टी चर्चेसाठी आहेत. आज विलीनीकरणावरच बोलेन जे विचारायचं ते विचारा मात्र यापुढे मी शांत बसेन. मला या चर्चांचा कंटाळा आल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. विलिनीकरणावर पुन्हा बोलणार नसल्याचेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. माझा दादा गेला आणि तो विषय आमच्यासाठी संपल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दादा गेल्यानंतर विलिनीकरणाचा विषय आमच्या मनातही राहिला नाही. तो विषय आमच्यासाठी तिथेच संपला आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. मात्र, त्यावर स्पष्ट बोलताना आता सुप्रिया सुळे दिसल्या. सत्तेत सहभागी होणार नसल्याचे सांगतानाही सुप्रिया सुळे दिसल्या. लोकशाहीवर आमचा विश्वास असल्याचे मोठे विधान सुप्रिया सुळे यांनी केले.

Follow Us
राहुल गांधींना खोटं बोलण्याचं व्यसन; फोन टॅपिंगच्या आरोपावरून शिंदेंचा
Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना खोटं बोलण्याचं व्यसन; फोन टॅपिंगच्या आरोपावरून एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
CEO जेन्सन हुआंग यांच्यावर चिनी महिलेचा हनी ट्रॅप? नेमकं प्रकरण काय?
Jensen Huang : CEO जेन्सन हुआंग यांच्यावर चिनी महिलेचा हनी ट्रॅप? नेमकं प्रकरण काय?
जळगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, मुक्ताईनगर-रावेरमध्ये सकाळी 9.16..
Jalgaon : जळगाव जिल्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, मुक्ताईनगर-रावेरमध्ये सकाळी 9.16 वाजता जमीन थरथरली; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम....
Pune : पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम चित्रपटाच्या शूटिंगवरून नवा वाद
करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली
Karuna Munde : करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? हर्षवर्धन सपकाळ यांची घेतली भेट; चर्चांना उधाण
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं?
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं? मुंबई महापालिकेतील बैठकीवरून नवा राजकीय वाद
राज ठाकरे काहीही करा, छठपूजा थांबणार नाही; सदावर्तेंचं थेट आव्हान...
Gunaratna Sadavarte On Raj Thackeray : राज ठाकरे काहीही करा, छठपूजा थांबणार नाही; सदावर्तेंचं थेट आव्हान
दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा..
NCP : दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, मुंबईत सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा; राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय?
पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि....
Pune-Solapur Highway : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि प्रवासी जखमी; वाहतुकीचा खोळंबा
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण