सायबर हल्ला की AI? मायक्रोसॉफ्टची सेवा ठप्प होण्यामागे कारण काय? व्हायरल दाव्यांवर अधिकाऱ्याची प्रतिक्रिया
मायक्रोसॉफ्ट 365 सेवांमध्ये जागतिक स्तरावर व्यत्यय आला होता, त्याचा परिणाम लाखो युजर्सवर झाला. अनेकांच्या रोजच्या कामकाजात अडथळा निर्माण झालेला.

दोन दिवसांपूर्वी मायक्रोसॉफ्ट 365 सेवा अचानक ठप्प पडली होती. ज्यामुळे अनेक कंपन्यांचे नुकसान झाले, काहींचे तर १ टक्काही काम झाले नाही. मायक्रोसॉफ्ट मधील या बिघाडामुळे विमान उड्डाणेही रद्द केली गेली. १२ नोव्हेंबरच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या या इशूमुळे जगभरातील लाखो लोक आउटलुक (Outlook) ईमेल, टीम्स (Teams) मीटिंग टूल्स आणि इतर कामासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या सेवांचा वापर करू शकत न्हवते. केवळ अमेरिकाच नव्हे, तर भारत, जपान आणि इतर अनेक देशांमधील खाजगी क्षेत्र, बँका, सरकारी विभाग आणि न्यायालयेही यामुळे प्रभावित झाल्या होत्या. या घडामोडीमुळे एकच खळबळ माजली होती. यामागे नेमकं कारण काय? असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला. अनेकजण याला सायबर हल्ला असं म्हणतं होते.
माइक्रोसॉफ्ट 365 ठप्प होण्यामागे कारण काय?
माइक्रोसॉफ्ट 365 ठप्प होण्यामागे काय कारण याचा शोध घेतला जात होता. अनेकांनी वेगवगळ्या थेअरी बनवा. एवढंच नाही तर सोशल मीडियावरही अनेक प्रकारचे दावे केले गेले. काही लोकांनी या घटनेला सायबर हल्ला असं म्हंटल तर काहींच्या मते मायक्रोसॉफ्टमधील ही बिघाड-स्थिती एका ‘अनियंत्रित’ (rogue) झालेल्या एआय (AI) एजंटमुळे उद्भवली आहे.
कंपनीचे उत्तर काय?
माइक्रोसॉफ्ट 365 ठप्प होण्यामागे जी कारण सोशल मीडियावर फिरत होती त्या सगळ्या दाव्यांना, कारणांना कंपनीने फेटाळून लावलेआहेत आणि स्पष्टपणे म्हटले आहे की, हे सायबर हल्ला असल्याचे दर्शवणारे कोणतेही संकेत नाहीत. मायक्रोसॉफ्टमधील ‘को-पायलट’, ‘एजंट्स’ आणि ‘प्लॅटफॉर्म’ विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष चार्ल्स लमाना यांनी एका पोस्टद्वारे म्हटले आहे की, “आज आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे (आउटेज) आमच्या ग्राहकांना ज्या अडचणींचा सामना करावा लागला, त्याबद्दल आम्हाला खेद वाटतो आणि आम्ही ही समस्या सोडवण्यासाठी काम करत आहोत.”
याशिवाय चार्ल्स लमानाहे सुद्धा म्हणाले की, “आम्हाला जशी अधिक माहिती मिळेल, तशी आम्ही ती शेअर करत राहू. सध्या तरी, हे प्रकरण कोणत्याही दुर्भावनापूर्ण कृतीचा किंवा सायबर हल्ल्याचा परिणाम असल्याचे दर्शवणारे कोणतेही संकेत नाहीत, याची मी खात्री देऊ शकतो.”
सुरु झालं मायक्रोसॉफ्ट 365?
आता मायक्रोसॉफ्ट आउटलुक बहुतेक युजर्ससाठी पुन्हा सुरळीत काम करत आहे. पूर्ण सेवा पूर्ववत होण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. १२ नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या एका मोठ्या जागतिक तांत्रिक बिघाडानंतर, मायक्रोसॉफ्टने ईमेलचा साचलेला भार (backlogs) लक्षणीयरीत्या कमी केला असून आशिया-पॅसिफिकसह बहुतेक क्षेत्रांमध्ये सेवा पुन्हा सुरु झाली आहे.
