AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : लग्नाआधी हळद सोडून नवरी चिखलाने माखली, Video पाहून नेटकरी हैराण

लग्नाच्या दिवशी नवरीसोबत असं काही घडलं की ती हळदीने माखण्याऐवजी चिखलानेच माखली. तिचा पांढरा शुभ्र ड्रेस काळकुट्ट झाला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी सहानुभूती व्यक्त केली आहे.

Video : लग्नाआधी हळद सोडून नवरी चिखलाने माखली, Video पाहून नेटकरी हैराण
viral video Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 14, 2026 | 1:21 PM
Share

लग्नाचा दिवस म्हटलं की नवरीच्या मनात किती स्वप्न असतात! सुंदर ड्रेस, मेकअप, फोटोशूट आणि सगळ्यांच्या उपस्थितीत होणारा लग्नसोहळा… पण एका नवरीसोबत लग्नाआधी असं काही घडलं आहे की तिच्या लग्नाची सुरूवात हळदीने होण्याऐवजी चिखलाने झाली. नवरी- नवरदेवाला घेऊन जाणारी कार अचानक रस्त्यावरून भातशेतीच्या मळ्यात पलटली. नवरीचा पांढरा शुभ्र ड्रेस संपूर्ण चिखलाने माखला.

नेमका अपघात कसा घडला?

ही घटना व्हिएतनाममधील तुयेन व्कांग प्रांतात घडली.10 नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे 10 वाजता 21 वर्षीय ली वान व्हिएत आणि त्याची नवरी 19 वर्षीय डॅम थी शुआन लग्नासाठी नवऱ्याच्या घरी जात होते. लग्नघर अवघ्या काही मिनिटांवर असताना त्यांची कार अचानक रस्त्यावरून घसरली आणि जवळपास एक मीटर खाली असलेल्या भातशेतीच्या चिखलाच्या मळ्यात पडली.

नवरदेवाने दिलेल्या माहितीनुसार, कारच्या बोनेटवर फुलांची सजावट करण्यात आली होती. मात्र जोरदार वाऱ्यामुळे ही सजावट उडून थेट कारच्या पुढच्या काचेवर आली. त्यामुळे चालकाला समोरचा रस्ता दिसेनसा झाला आणि कारवरील नियंत्रण सुटलं. कार पलटी झाल्यानंतर बाकीचे वऱ्हाडी लगेच मदतीसाठी धावले पण सुरूवातीला कारचं वजन जास्त असल्याने कारला उचलण्यात यश आले नाही. त्यानंतर आसापासच्या नागरिकांच्या मदतीने कार उचलली आणि नवरा नवरीला त्या चिखलातून बाहेर काढण्यात यश आले.

नवरी जशी कारमधून बाहेर आली तेव्हा तिचा पांढरा शुभ्र लग्नाचा ड्रेस, केस आणि शरीराचा बराच भाग चिखलाने माखला होता. कार नवरी बसलेल्या बाजूवरून पलटी झाल्याने खिडकीतून चिखल तिच्यावर उडाला. तिची ती अवस्था पाहून हसावं की रडावं हे लोकांना कळत नव्हतं.

अपघातानंतर नवरीला नवरदेवाच्या घरी नेण्यात आलं. तिथे तिने अंघोळ करून कपडे बदलले. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी कुटुंबीय तिला रूग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर नवरी आणि पोटातील बाळ दोघेही सुखरूप असल्याचं कळलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोकांना हसावं की रडावं हे कळलंच नाही. अनेक जण हसले, तर काहींनी नवरीच्या ड्रेसबद्दल आनंदाच्या प्रसंगी घडलेल्या अशा घटनांविषयी सहानुभूती व्यक्त केलं.

Follow Us
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..
Pune Case : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने रद्द!
विलिनीकरणाचा एक-दोन दिवसात 'द एंड' होईल, राऊतांचा दावा; नेमकं काय..
Sanjay Raut On NCP Merger : विलिनीकरणाचा एक-दोन दिवसात 'द एंड' होईल, राऊतांचा दावा; असं काय म्हणाले?
भोसरीत मतदार यादीचा घोळ? तब्बल 15 हजार मतदारांची नावे दुसरीकडे शिफ्ट,
भोसरीत मतदार यादीचा घोळ? तब्बल 15 हजार मतदारांची नावे दुसरीकडे शिफ्ट, अजित गव्हाणेंचा गंभीर आरोप!
मालाडमध्ये छठपूजेचा उत्साह! मनसे नेत्यांकडून जय्यत तयारी...
मालाडमध्ये छठपूजेचा उत्साह! मनसेच्या सुरेखा परब यांच्याकडून जय्यत तयारी, जोरदार बॅनरबाजी
मुंबईनंतर पुण्यातही मफलरवाला पोस्टर; अजितदादांचा अपघात की घातपात?
Ajit Pawar Poster Controversy : मुंबईनंतर पुण्यातही मफलरवाला पोस्टर; अजितदादांचा अपघात की घातपात? राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादांचा अपघात की घातपात? मुंबईत मफलर असलेलं पोस्टर झळकलं....
Ajit Pawar : अजितदादांचा अपघात की घातपात? मुंबईत मफलर असलेलं पोस्टर झळकलं; 16 नोव्हेंबरला रोहित पवार मोठा खुलासा करणार?
भावासोबत पुढे जायचं होतं पण...; आता काय चर्चा करायची? चर्चांना....
Supriya Sule On NCP Merger : भावासोबत पुढे जायचं होतं पण...; आता काय चर्चा करायची? चर्चांना पूर्णविराम!
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून कोणताही प्रस्ताव नाही; पटेल भेटीवर...
Supriya Sule On Praful Patel Meeting : अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून कोणताही प्रस्ताव नाही; प्रफुल्ल पटेल भेटीवर सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण
विलीनीकरणाचा विषय आमच्यासाठी...; सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण
Supriya Sule On NCP Merger : विलीनीकरणाचा विषय आमच्यासाठी...; सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण, राष्ट्रवादीच्या चर्चांना पूर्णविराम?
ओम राजेंच्या प्रश्नावर एका वाक्यात दिलं आदित्य ठाकरेंनी उत्तर; म्हणाले
Aaditya Thackeray : ओम राजेंच्या प्रश्नावर एका वाक्यात दिलं आदित्य ठाकरेंनी उत्तर; म्हणाले...