Coastal Road Accident: कोस्टल रोडवर मध्यरात्री अपघाताचा थरार! विचित्र अपघातात 5 ते 6 गाड्या एकमेकांना धडकल्या
Mumbai Coastal Road Accident: मुंबईच्या कोस्टल रोडवर काल रात्री मोठा अपघात झाला. या विचित्र अपघातात 5 ते 6 गाड्या एकमेकांना धडकल्या. त्यातील एका वाहनाला आग लागली. अग्निशमन दलाने तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला.

Mumbai Coastal Road Accident: मुंबईच्या कोस्टल रोडवर काल रात्री मोठा अपघात झाला. या विचित्र अपघातात जवळपास 5 ते 6 गाड्या एकमेकांना आदळल्या. अनियंत्रित वेगाने येणाऱ्या एका महिंद्रा एसयूव्ही कारने उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे महिंद्रा एसयूव्हीमध्ये आग लागल्याने धावपळ सुरू झाली. अग्निशमन दलाने तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. काही जण जखमी झाले.
रात्री 3 वाजता काय घडलं?
मुंबईच्या कोस्टल रोडवर काल रात्री नरीमन पॉईंट वरून वरळी कडे येणाऱ्या मार्गावर सुरुवातीला 2 गाड्यांचा अपघात झाला होता. रात्री 3 च्या सुमारास झालेल्या या अपघातमुळे काही गाड्या थांबल्या होत्या. त्याच दरम्यान मागून अनियंत्रित वेगाने येणाऱ्या एका महिंद्रा एसयूव्ही कारने उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे महिंद्रा एसयूव्ही मध्ये आग लागल्याने धावपळ सुरू झाली.
माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले आणि आग विझविण्यात आली. सुदैवाने या घटनेत सर्वजण वाचले मात्र काहींना किरकोळ जखमी झाले. मागून अनियंत्रित वेगाने एसयुने धडक देणाऱ्या एसयूव्हीचा ड्रायव्हर नशेत होता का ? याची चौकशी सुरू आहे. काल रात्री या अपघातामुळे जवळपास दीड तास वाहतूक बंद असून नंतर सुरू करण्यात आली. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई स्थानिक पोलीस करत आहेत
बारामती-मोरगाव मार्गावर धावत्या एसटीचा धक्कादायक प्रकार
बारामती-मोरगाव मार्गावर धावणाऱ्या एसटी बसमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमएच १४ एनई ३५७४ क्रमांकाची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस साईडचा पॅनेल दरवाजा बाहेरच्या बाजूला उघडा ठेवूनच सुसाट धावत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणाऱ्या या प्रकारामुळे मोठ्या अपघाताची भीती व्यक्त होत आहे. दरवाजा उघडा ठेवून बस चालवणे म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार नाही का? संबंधित बस चालकाच्या निष्काळजीपणाबाबत एसटी महामंडळ प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चौकशी करावी आणि प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे.बारामती-मोरगाव मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल विचारल्या जात आहे.
