AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरा इतर पुरुषांना बेडरूममध्ये बोलावून… 5 वर्ष तिला माहितचं नव्हतं, महिलेने लाइव्ह येऊन सर्वच सांगितलं

एका ब्रिटनच्या महिलेने नवऱ्याच्या क्रूर कृत्याचा पर्दाफाश केला. नवरा तिला अंमली पदार्थ देऊन बेशुद्ध करायचा आणि नंतर इतर पुरुषांकडून तिच्यावर बलात्कार घडवून आणायचा. पाच वर्षे तिला याची कल्पना नव्हती. सत्य समोर आल्यावर नवऱ्याला 14 वर्षांची शिक्षा झाली. या धक्कादायक घटनेने ब्रिटन हादरले आहे.

नवरा इतर पुरुषांना बेडरूममध्ये बोलावून... 5 वर्ष तिला माहितचं नव्हतं, महिलेने लाइव्ह येऊन सर्वच सांगितलं
womenImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 12, 2026 | 11:51 PM
Share

लग्नानंतर ज्या व्यक्तीवर सर्वाधिक विश्वास टाकला त्यानेच तिचं आयुष्य नरक केलं. ब्रिटनच्या एका महिलेने नवऱ्याचा पर्दाफाश केला. तिचा नवरा तिला अंमली पदार्थ देऊन बेहोश करायचा. त्यानंतर दुसऱ्या पुरुषांना बोलवून तिच्यावर बलात्कार करायला लावायचा आणि स्वत: उभं राहून हा सर्व प्रकार पाहायचा, अशी धक्कादायक माहिती या महिलेने दिली आहे. या महिलेने टीव्हीवर लाइव्ह येऊन तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढाच वाचला आहे. त्यामुळे संपूर्ण ब्रिटन हादरून गेलं आहे.

तिचा नवरा इतक्या खालच्या पातळीवर गेला होता की, तो या संपूर्ण प्रकाराची ऑनलाइन स्ट्रिमिंगही करायचा. पाच वर्ष या महिलेला या गोष्टीची गंधवार्ताच नव्हती. एकदा रात्री अचानक तिचे डोळे उघडले. तिने स्वत:ला अनोळखी पुरुषासोबत पाहिलं. त्यावेळी तिला हा सर्व धक्कादायक प्रकार समजला. जेव्हा या महिलेला हे सर्व समजलं तेव्हा तिच्या पायाखालची वाळूच सरकली होती.

गुंगी आणणारे औषध

डेली मेलच्या वृत्तानुसार, या महिलेने या आठवड्यात तिने तिची ओळख सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला. तिने आयटीव्ही न्यूजवर तिच्या नवऱ्याची सर्व हकिकत सांगितली. नवऱ्याचा समाजातील वावर अत्यंत सामान्य आहे. आमचे कौटुंबीक फोटो पाहिले तर आम्ही एक सुखी आणि आनंदी कपल असल्याचं दिसेल. पण घरात माझा नवरा हिंसक आणि कंट्रोलिंग होता, असं ही महिला म्हणाली.

महिलेच्या मते, डॉक्टरने दिलेल्या औषधांवर तिच्या नवऱ्याचा कंट्रोल होता. एका होम व्हिडीओतही तो तिला औषध घ्यायला सांगत आहे. या औषधांचा वापर तिला बेशुद्ध करण्यासाठी केला जात असल्याचा या महिलेला संशय आहे. मला बेशुद्ध करून माझ्यावर दुसऱ्या पुरुषांकडून बलात्कार करता यावा म्हणून तो असं करत असेल, असं या महिलेला वाटतं.

अनेकदा माझ्या नवऱ्याने औषधांची पावडर माझ्या ड्रिंकमध्ये मिसळली होती. त्यानंतर त्याने GHB नवाच्या अंमली पदार्थाचा वापर केला. यामुळे व्यक्ती बेशुद्ध होतो. तिच्या नवऱ्याने कारची चाके साफ करणाऱ्या एका क्लिनरद्वारेही या पदार्थाचा वापर केला असल्याचं सांगण्यात येतं.

त्या रात्री काय घडलं?

ज्या दिवशी तिला हा सर्व प्रकार कळला त्या रात्रीची संपूर्ण हकिकत या महिलेने सांगितली आहे. रात्रीच्या वेळी मी किचनमध्ये नवऱ्यासोबत बसले होते. तेव्हा नवऱ्याने ड्रिंक पिण्याचा सल्ला दिला. त्याने जिन अँड टॉनिक बनवून दिलं. माझ्या ड्रिंकमध्ये नवरा काही मिसळू शकतो, याबाबत मला काहीच शंका नव्हती. मी पूर्ण ड्रिंक संपवलं होतं की नाही हे मला आठवत नाही. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी अंथरूणावर वस्त्रहिन अवस्थेत होते. एक अनोळखी व्यक्ती माझ्यावर बलात्कार करत होता. जेव्ही मी लगेच बाजूला पाहिलं तर माझा नवरा दरवाजात उभा होता. त्यावेळी मला माझी हत्या होईल असं वाटलं. मी लगेच अंथरून ओढलं, त्यामुळे तो माणूस घाबरला आणि पळून गेला, असं तिने सांगितलं.

पाच वर्ष तिच्यावर बलात्कार होत होता. 2022मध्ये या महिलेच्या नवऱ्याला या गुन्ह्याबद्दल 14 वर्ष आणि 8 महिन्याची सजा झाली आहे. त्या शिवाय आठ वर्षाचा निगराणी कालावधीही लावण्यात आला आहे. त्यावेळी त्याचं वय 43 वर्ष होतं. तो ब्रिस्टलचा रहिवाशी होता. या आरोपीने तीन वेळा बलात्कार, तीन वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न, शारिरीक हल्ला आणि विषारी पदार्थ देण्याचा आरोप स्विकारला होता. दरम्यान, या प्रकरणातील इतर सात आरोपी अजूनही फरार आहेत.

Follow Us
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'