AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती घराण्याच्या नावाचा वापर करून कधीही मते मागितली नाहीत, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे अंकुश कदम यांना प्रत्युत्तर

छत्रपती घराण्याच्या नावाचा वापर करून कधीही मते मागितली नाहीत, आपण कामाच्या जोरावरच निवडून आलो आहोत असे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अंकुश कदम यांना प्रत्युत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

छत्रपती घराण्याच्या नावाचा वापर करून कधीही मते मागितली नाहीत, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे अंकुश कदम यांना प्रत्युत्तर
shivendra raje bhosale
| Updated on: Nov 12, 2026 | 11:47 PM
Share

“मी छत्रपतींचा वारस आहे म्हणून मला निवडून द्या, असे मी आजवर लढलेल्या चारही निवडणुकांमध्ये कधीही म्हटलेले नाही. मला माझ्या घराण्याचा सार्थ अभिमान आहे, मात्र राजकारणासाठी आणि निवडून येण्यासाठी मी कधीही घराण्याच्या नावाचा वापर केलेला नाही, तर माझ्या कामाच्या जोरावरच मते मागितली आहेत,” अशा शब्दांत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी ‘छत्रपती घराण्याची कवच कुंडले काढून निवडणुकीत उतरा’ या शिवसेना प्रवक्ते अंकुश कदम यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे.

जनतेच्या मनात राजघराण्याबद्दल प्रेम आणि श्रद्धा आहेच, पण ज्यांच्याकडे स्वतःचे असे काहीच सांगण्यासारखे नाही आणि ज्यांना आरोप करता येत नाहीत, तेच लोक पळवाट काढण्यासाठी आणि शब्दांचा खेळ करून महाराज आणि सामान्य जनता अशी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे. तसेच, निवडणुका आल्यावरच विरोधकांचा ‘जावळीचा स्वाभिमान’ कसा जागा होतो आणि इतर वेळी तो मुंबईला का निघून जातो? असा खोचक सवालही शिवेंद्रराजे यांनी यावेळी केला आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अंकुश कदम यांचे पुन्हा उत्तर

राजकीय टीका किंवा प्रश्नांपासून वाचण्यासाठी ‘छत्रपती’ या शब्दाचा किंवा गादीचा ‘कवच-कुंडले’ म्हणून वापर करू नये. आपण आता लोकशाहीत आहोत असे आपण म्हटले होते असे शिवसेनेचे प्रवक्ते अंकुश कदम यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की तुम्ही जनतेतून निवडून येत १५ वर्षे आमदार राहिलात आणि आता राज्याचे मंत्री आहात.निवडणुका लढवताना एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होतच असतात. ​विचारलेले प्रश्न हे छत्रपतींच्या गादीला नसून जावळीच्या आमदाराला, राज्याच्या मंत्र्याला आणि एका लोकप्रतिनिधीला विचारले आहेत. ​स्वतःची पापे लपवण्यासाठी जाणीवपूर्वक ‘छत्रपतींचा अपमान झाला’ असा कांगावा करून छत्रपतींच्या नावाला बदनाम करू नका असेही कदम यांनी म्हटले आहे.

Follow Us
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'