पुणेकरांच्या खिशाला कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; जाणून घ्या नवीन दर
CNG PNG Rate Increase: पुण्यात मध्यरात्री अचानक CNG आणि PNG चे दर वाढले असून यामुळे पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. नवीन दर नेमके काय आहेत हे जाणून घ्या.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह चाकण, तळेगाव व हिंजवडी परिसरातील नागरिकांना आता CNG आणि PNG साठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (MNGL) गॅसच्या दरात वाढ जाहीर केली असून, 12 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले आहेत. वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या CNG च्या दरात प्रति किलो 1 रुपये 25 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे CNG चा दर आता 97 रुपये 75 पैशांवरून थेट 99 रुपये प्रति किलो झाला आहे. सीएनजीचा वापर करणाऱ्या वाहनचालकांच्या मासिक इंधन खर्चात यामुळे वाढ होणार आहे.
दुसरीकडे, घरगुती वापरासाठीच्या पाइप्ड नॅचरल गॅसच्या (PNG) दरातही वाढ करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात PNG च्या दरात प्रति स्टँडर्ड क्युबिक मीटर (SCM) 1 रुपये 50 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे घरगुती PNG चा नवा दर आता 53 रुपये प्रति SCM इतका असेल.
गॅसच्या दरवाढीमुळे वाहनचालकांसह घरगुती गॅस ग्राहकांच्या मासिक खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे.
१३ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रातील विविध शहरे आणि जिल्ह्यांतील सीएनजीचे (CNG) दर खालीलप्रमाणे आहेत.
प्रमुख शहरे (ताजे अधिकृत दर)
मुंबई आणि उपनगरे: ₹९०.००, पुणे आणि पिंपरी-चिंचवड: ₹९९.०० – ₹९९.७५, नाशिक: ₹९९.७५.
इतर शहर आणि जिल्हातील दर यादी
अहमदनगर: ₹१०५.३६, अकोला: ₹११०.४८, अमरावती: ₹११०.७३, छत्रपती संभाजीनगर: ₹१०५.३६, बीड: ₹१०१.६०, भंडारा: ₹१०७.४३, बुलढाणा: ₹११०.७३, चंद्रपूर: ₹१०६.००, धुळे: ₹९३.६५, गडचिरोली: ₹१०७.४३, गोंदिया: ₹१०७.४३, हिंगोली: ₹११०.४८, जळगाव: ₹९९.६०, जालना: ₹९९.६०, कोल्हापूर: ₹९६.९५, लातूर: ₹९४.००, नागपूर: ₹८८.९०, नांदेड: ₹९६.००, नंदुरबार: ₹१०८.०९, नवी मुंबई: ₹११०.७३, धाराशिव: ₹९४.००, पालघर: ₹८५.७५, परभणी: ₹९०.६५, रायगड: ₹९९.५२, रत्नागिरी: ₹९४.००, सांगली: ₹१०५.३६, सातारा: ₹१०५.३६, सिंधुदुर्ग: ₹९१.००, सोलापूर: ₹१०५.००, ठाणे: ₹८५.७५, वर्धा: ₹१०६.००, वाशिम: ₹११०.४८, यवतमाळ: ₹११०.७३.
टीप: हे सर्व दर प्रति किलो रुपयांमध्ये (₹/kg) आहेत.
१३ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरे आणि जिल्ह्यांतील घरगुती पीएनजीचे (PNG) दर खालीलप्रमाणे आहेत.
प्रमुख शहरे (ताजे अधिकृत दर)
मुंबई आणि उपनगरे: ₹५२.००, ठाणे आणि नवी मुंबई: ₹५२.००, पुणे आणि पिंपरी-चिंचवड: ₹५१.७५ – ₹५३.००, नाशिक: ₹५१.७५.
इतर शहर आणि जिल्हातील दर यादी
अहमदनगर: ₹५०.५०, अकोला: ₹५१.४०, अमरावती: ₹५१.४०, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर): ₹५०.५०, भंडारा: ₹५१.४०, गोंदिया: ₹५१.४०, हिंगोली: ₹५१.४०, कोल्हापूर: ₹५१.५०, लातूर: ₹४६.००, नागपूर: ₹४९.९०, नंदुरबार: ₹४८.३१, उस्मानाबाद (धाराशिव): ₹४६.००, पालघर: ₹५०.८७, रायगड: ₹५२.००, रत्नागिरी: ₹४६.००, सांगली: ₹५०.५०, सातारा: ₹५०.५०, सिंधुदुर्ग: ₹४९.२५, सोलापूर: ₹५०.५०, वाशिम: ₹५१.४०, यवतमाळ: ₹५१.४०.
टीप: हे सर्व दर घरगुती वापरासाठी प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटर (₹/SCM) रुपयांमध्ये आहेत. (स्रोत: Goodreturns आणि प्रादेशिक गॅस वितरक).
स्थानिक गॅस वितरण कंपनीनुसार (MGL, MNGL, Adani Total Gas, BPCL इ.) काही भागांत दरांमध्ये थोडा फरक असू शकतो.
