‘कोरोनाची तिसरी लाट आली, राज्य सरकार, ‘हाफकीन’ने आतातरी जागं व्हावं’, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुनावले खडे बोल

कोरोनाची तिसरी लाट आली असताना सरकारी रुग्णालय अजूनही वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करत नाही. सात दिवसात वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करावा. अन्यथा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी स्वत: न्यायालयात हजर राहावे, अशा कडक शब्दात नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला फटकारलं आहे.

'कोरोनाची तिसरी लाट आली, राज्य सरकार, 'हाफकीन'ने आतातरी जागं व्हावं', उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुनावले खडे बोल
उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ

नागपूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) वाढतोय. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कठोर निर्बंध (Corona Restrictions) लागू करण्यात आले आहेत. असं असतानाही उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (High Court Nagpur Bench) राज्य सरकार आणि हाफकीन इन्स्टिट्यूटला सुनावलं आहे. कोरोनाची तिसरी लाट आली असताना राज्य सरकार आणि हाफकीन संस्थेनं आतातरी जागं व्हावं, असे खडे बोल न्यायालयाने सुनावले आहेत.

कोरोनाची तिसरी लाट आली असताना सरकारी रुग्णालय अजूनही वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करत नाही. सात दिवसात वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करावा. अन्यथा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी स्वत: न्यायालयात हजर राहावे, अशा कडक शब्दात नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला फटकारलं आहे. राज्य सरकारने सरकारी रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय साहित्य पुरवले नसल्याच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी पार पडली.

राज्यात आज 46 हजार 406 नवे रुग्ण

राज्यात आज पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील 24 तासात राज्यात 46 हजार 406 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. तर 34 हजार 658 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. दरम्यान, आज राज्यातील मृतांची संख्या वाढली आहे. दिवसभरात 36 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. तर राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 51 हजार 828 आहे. राज्यातील एकूण आकडेवारीवर नजर टाकली तर राज्यात आतापर्यंत 70 लाख 81 हजार 67 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यातील 66 लाख 83 हजार 769 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 लाख 41 हजार 737 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईत 13 हजार 702 कोरोना रुग्ण

मुंबईत आज दिवसभरात 13 हजार 702 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 20 हजार 849 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या 95 हजार 123 आहे. आतापर्यंत 8 लाख 55 हजार 811 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील बरे होणाऱ्या रुग्णांचा दर 88 टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 36 दिवसांवर आहे.

इतर बातम्या :

‘परिश्रम हा एकमात्र मार्ग आणि विजय हाच एकमात्र पर्याय’, कोरोना स्थितीबाबत पंतप्रधान मोदींचा राज्यांना सल्ला

Maharashtra Corona Update : पंतप्रधान मोदींकडून सर्व राज्यांचा आढावा; महाराष्ट्राकडून कोणत्या प्रमुख मागण्या?

Published On - 10:26 pm, Thu, 13 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI