विठुरायाच्या दान पेटीत चक्क बनावट दागिने, वर्षभरात कोट्यावधी रुपयांचे दानही

| Updated on: Jan 05, 2023 | 9:42 PM

विठुरायाच्या दान पेटीत रोख रक्कम बरोबरच सोने, चांदी, पितळ अशा धातूच्या वस्तूही दान पेटीत टाक भाविक श्रद्धेपोटी टाकतात. त्याचबरोबर आता बनावट दागिने सापडले आहेत. त्यामुळे सध्या याचे काय करायचे याची चिंता मंदीर समितीला लागली आहे.

Follow us on

पंढरपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल मंदिराला वर्षभरात कोट्यावधी रुपयांचे दान मिळते. येथील दान पेटीत भरलेली असते. आता या दान पेटीतच बनावट दागिने सापडल्याने अनेकांना धक्का बसला आहे. दान पेटीतील साहित्य आणि पैसांची मोजणी करताना हे दागिने सापडले आहेत.

विठुरायाच्या दान पेटीत रोख रक्कम बरोबरच सोने, चांदी, पितळ अशा धातूच्या वस्तूही दान पेटीत टाक भाविक श्रद्धेपोटी टाकतात. त्याचबरोबर आता बनावट दागिने सापडले आहेत. त्यामुळे सध्या याचे काय करायचे याची चिंता मंदीर समितीला लागली आहे.

तर भाविकांनी दान करण्यासाठी सोने– चांदीच्या वस्तू खरेदी करताना दुकानदाराकडून पावती घ्यावी; म्हणजे फसवणूक होणार नाही असे आवाहन मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी केले आहे.