Gokul Election : गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात – सुत्र

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी आज होणाऱ्या बैठकीत महायुतीचे संचालक गैरहजर राहणार असल्याने तांत्रिक पेच निर्माण झाला आहे. १३-१२ असे संख्याबळ असलेल्या सतेज पाटील आघाडीला अध्यक्ष निवडीसाठी १४ संचालकांची गरज आहे. महायुती अनुपस्थित राहिल्याने कोरम पूर्ण होणार नाही, त्यामुळे सतेज पाटील कायदेशीर सल्ला घेत आहेत.

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी आज (सोमवारी) सकाळी ११ वाजता शिरगाव येथील मुख्य कार्यालयात होणारी बैठक महायुतीच्या अनुपस्थितीमुळे पेचात सापडली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीचे १२ संचालक बैठकीला गैरहजर राहणार आहेत. हे सर्व संचालक सध्या बेळगावमध्ये असल्याची माहिती आहे.

गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी एकूण १४ संचालकांची उपस्थिती आवश्यक आहे, तर सतेज पाटील यांच्या आघाडीकडे १३ आणि महायुतीकडे १२ संचालक आहेत. महायुतीचे संचालक गैरहजर राहिल्यास अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेला कोरम पूर्ण होणार नाही. त्यामुळे अध्यक्ष निवडीमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी तात्काळ कायदेशीर सल्ला घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या अजिंक्यतारा कार्यालयात वकिलांची फौज दाखल झाली असून, ते या कायदेशीर पेचातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. महायुतीच्या अनुपस्थितीमुळे आजची अध्यक्ष निवड पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us