आमदार खासदारांनी पेन्शन घेता कामा नये, कारण…; बच्चू कडू यांचं लोकप्रतिनिधींना उद्देशून महत्वाचं वक्तव्य

| Updated on: Mar 15, 2023 | 1:23 PM

Bacchu Kadu : आमदार-खासदारांना,अधिकारी-कर्मचाऱ्यांना पगार पाहिजे तर मग शेतकऱ्यांना का नको? शेतकऱ्याला साठ वर्षानंतर पोट नसत का? त्याला जगायला पैसे लागत नाहीत का? कामाच मूल्यमापन झालं पाहिजे. त्यानुसार पगार अन् पेन्शन दिली पाहिजे, असं बच्चू कडू म्हणालेत. पाहा...

Follow us on

अमरावती : जुनी पेन्शन योजना सुरु करण्यात यावी यासाठी राज्यात सरकारी कर्मचारी आंदोलन करत आहेत. यावर बोलताना प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी लोकप्रतिनिधींच्या पेन्शनवर भाष्य केलंय.”आमदार-खासदारांनी पेन्शन सोडली पाहिजे. मी चार वेळा निवडुन आलो आहे. मला 60 हजार पेन्शन भेटणार आहे. त्याची काय गरज आहे? लोकप्रतिनिधींनी पेन्शन घेता कामा नये”, असं बच्चू कडू म्हणालेत. “देशात अजूनही एक वर्ग असा आहे की जो 4 टक्के लोक भूक बळीने मरतोय. अंगणवाडी सेविकेला फक्त 7 हजार पगार देता आशा सेविकेला 4 हजार पगार दिला जातोय. ही विषमता दूर झाली पाहिजे”, असंही बच्चू कडू म्हणालेत.