वरळीत आदित्य ठाकरेंचा प्रचार, स्थानिकांकडून ‘आरे’विरोधात पोस्टरबाजी

| Updated on: Oct 06, 2019 | 2:27 PM

आदित्य ठाकरेंच्या प्रचार फेरीदरम्यान त्यांना आरेतील झाडांच्या कत्तलींच्या निषेधार्थ पोस्टरबाजी (save Aarey poster showed to Aaditya Thackeray during campaigning) करण्यात आली.

वरळीत आदित्य ठाकरेंचा प्रचार, स्थानिकांकडून आरेविरोधात पोस्टरबाजी
Follow us on

मुंबई : येत्या विधानसभा निवडणुकीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले (save Aarey poster showed to Aaditya Thackeray during campaigning) आहे. यासाठी वरळीत रविवारी प्रचारफेरीचे आयोजन करण्यात (save Aarey poster showed to Aaditya Thackeray during campaigning) आले होते. मात्र आदित्य ठाकरेंच्या प्रचार फेरीदरम्यान त्यांना आरेतील झाडांच्या कत्तलींच्या निषेधार्थ पोस्टरबाजी (save Aarey poster showed to Aaditya Thackeray during campaigning) करण्यात आली.

रविवारी सकाळी 9 पासून आदित्य ठाकरेंच्या प्रचारसभेला सुरुवात झाली. वीर जिजामाता नगर, सूर्यदर्शन पाणी खाते, पंचशिल सोसायटी, 141 टेनामेन्ट, डॉ. अॅनी बेझंट रोड, रेडीमेनी टेरेस, अंबालाल चाळ, फटाकडा चाळ, साईनाथ सोसायटी, मरिअम्मा नगर, वी.पी. नगर, मार्कंडेश्वर नगर, खान अब्दुल गफारखान मार्ग, नारायण पुजारी नगर, डेअर क्वाटर्स, सुभेदार रामजी नगर, वरळी हिल रोड, जरीमरी माता या ठिकाणाहून बी.जी. खेर मार्ग, माया नगर, प्रेमनगर या ठिकाणी आयोजित करण्यात (save Aarey poster showed to Aaditya Thackeray during campaigning) आली होती.

वरळीतील जिजामाता नगर या ठिकाणी आदित्य ठाकरे प्रचार करत असताना अचानक काहींनी त्यांच्याविरोधात पोस्टर बाजी केली. या पोस्टरमध्ये आरे वाचवा अशाप्रकारचा संदेश देण्यात आला. दरम्यान या प्रकरणी प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले, “ज्या लोकांना मला बॅनर दाखवले त्यांनी मी भेटलो. फक्त पर्यावरण प्रेमी नव्हे तर आमच्याही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. माझी सरकारला विनंती आहे की, त्यांनी तरुणावर केसेस टाकू नका. तसेच ज्या प्रकारे रात्री झाडं कापली ते नको होते. याप्रकरणीची योग्य ती भूमिका लवकरच ठरवू” असे ते म्हणाले.

वरळीत लोकांचं प्रेम आणि प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे. मी सर्वांना एक उमेदवार म्हणून भेटत आहे. प्रचार फेरीत लोकांचा फार मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. मी स्वत: चे एक उमेदवार म्हणून आहे याची मला मजा वाटते. वरळी हे राज्याचं प्रतीक आहे. या ठिकाणी निवडून येऊन मला एक नवा महाराष्ट्र घडवायला आवडेल, असं आदित्य ठाकरे यांनी प्रचारसभेदरम्यान सांगितले.

आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकरणी दाखल केलेल्या सर्व याचिका शुक्रवारी (4 ऑक्टोबर) मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या. आरे मेट्रो कारशेडप्रकरणी शुक्रवारी हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर रात्रीच्या अंधारात झाडं कापण्यास सुरुवात झाली. या सर्व गोष्टींचा निषेध करत आदित्य ठाकरेंनी ट्विट केलं होतं.