Agri Welfare Portal: सर्व योजनांची माहिती एकाच क्लिकवर, काय आहे ॲग्री वेलफेअर पोर्टल?

Agri Welfare Portal: सर्व सरकारी योजनांची माहिती आता शेतकऱ्यांना एकाच पोर्टलवर मिळणार आहे. त्यामुळे त्यांना शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. काय आहे ॲग्री वेलफेअर पोर्टल?

Agri Welfare Portal: सर्व योजनांची माहिती एकाच क्लिकवर, काय आहे ॲग्री वेलफेअर पोर्टल?
सर्व योजनांची माहिती एकाच क्लिकवर, काय आहे ॲग्री वेलफेअर पोर्टल?
| Updated on: Oct 21, 2026 | 1:57 PM

शेतकरी, शेती, हवामान आणि योजनांशी संबंधित माहिती आता एकाच क्लिकवर मिळेल. विविध सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आणि सबसिडीसाठी विविध सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेकदा अचूक माहिती मिळत नाही. अथवा विलंबाने माहिती मिळते. यामुळे शेतकऱ्यांना अनेक महत्त्वाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांची ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकऱ्यांसाठी ॲग्री वेलफेअर पोर्टल (Agri Welfare Portal) सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शेतीशी संबंधित सर्व सरकारी योजना आणि आवश्यक सेवा एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर मिळणार आहेत.

पोर्टल एक, सुविधा अनेक

Loading...

ॲग्री वेलफेअर पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी मंत्रालयाच्या विविध योजना, सबसिडी, नियम आणि डिजिटल सेवांची माहिती अगदी सहज उपलब्ध होईल. यासाठी आता शेतकऱ्यांना विविध शासकीय कार्यालयात जाण्याची अथवा विविध ठिकाणी माहिती घेण्याची गरज नाही. ते त्यांच्या स्मार्टफोनवरून अथवा जवळील महा ई सेवा केंद्रावरून शेतीशी संबंधित सर्व योजनांची माहिती एका क्लिकवर मिळवू शकतील.

या पोर्टलमुळे सर्व सरकारी योजना एकाच छताखाली आल्या आहेत. या पोर्टलवर कोणत्याही योजनेसाठी कसा अर्ज करावा. त्यासाठी कोणकोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील. सबसिडी कशी मिळेल. कोणती कागदपत्रं जोडावी लागतील याची माहिती एकाच ठिकाणी मिळेल. थेट लाभ हस्तांतरण-DBT योजनांची माहिती सुद्धा आणि आर्थिक सहाय्याशी संबंधित माहिती शेतकऱ्यांना मिळू शकेल.

हवामानापासून ते बाजारभावाची अचूक माहिती

शेतकऱ्यांना हवामानातील बदल, बियाणे आणि खतांची उपलब्धता, बाजारातील पिकांचे दरपत्रक आणि इतर आवश्यक माहितीही मिळेल. या पोर्टलच्या माध्यमातून हवामान, शेतीचे नवीन तंत्रज्ञान आणि बाजारभावाशी संबंधित अद्ययावत माहिती शेतकऱ्यांमार्फत पोहोचवली जाणार आहे. शेतकऱ्यांना पेरणी, पिकांची काळजी आणि विक्रीची तयारी याविषयीची माहिती या पोर्टलवर मिळणार आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना या पोर्टलचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तर कोणत्याही योजनेसाठी अर्ज करताना निकष, अटी आणि शर्तींचे पालन करण्यास सांगितले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us