शेतकऱ्यांसाठी भन्नाट मोबाईल अ‍ॅप्स, हवामान, पशुपालन आणि पिकांशी संबंधित माहिती एका क्लिकवर

Farmers | हल्ली स्मार्टफोन आणि इंटरनेट अगदी खेड्यांपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांनाही ही अ‍ॅप्स वापरणे सुलभ झाले आहे. सध्या प्ले स्टोअरवर शेतकऱ्यांसाठीची अनेक अ‍ॅप्स असली तरी मोजकी अ‍ॅप्स ही शेतकऱ्यांसाठी खरंच फायदेशीर ठरू शकतात.

शेतकऱ्यांसाठी भन्नाट मोबाईल अ‍ॅप्स, हवामान, पशुपालन आणि पिकांशी संबंधित माहिती एका क्लिकवर
शेती

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स सुरु करण्यात आली आहेत. या अ‍ॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीच्या नव्या पद्धती, तंत्रज्ञान आणि योजनांविषयी सातत्याने माहिती पुरवली जाते. हल्ली स्मार्टफोन आणि इंटरनेट अगदी खेड्यांपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांनाही ही अ‍ॅप्स वापरणे सुलभ झाले आहे. सध्या प्ले स्टोअरवर शेतकऱ्यांसाठीची अनेक अ‍ॅप्स असली तरी मोजकी अ‍ॅप्स ही शेतकऱ्यांसाठी खरंच फायदेशीर ठरू शकतात.

किसान सुविधा अ‍ॅप

किसान सुविधा अ‍ॅपवर तुम्हाला शेतीसंबंधीच्या माहितीसोबतच इतर बरीच माहिती उपलब्ध आहे. या अ‍ॅपवर पुढील पाच दिवसांच्या हवामानाचा अंदाज पाहता येतो. याशिवाय, पिकांचा बाजारभाव, शेतीविषयक सल्ले, पीक संरक्षण अशा गोष्टींविषयीही तुम्हाला बरीच माहिती मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन आणि बाजारात पीक कधी विकायचे, याचा अंदाज येण्यास मदत होते. याशिवाय, किसान सुविधा अ‍ॅपवर कृषी तज्ज्ञ आणि जाणकरांकडून सल्लेही दिले जातात.

केळ्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष अ‍ॅप

भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि राष्ट्रीय केळी अनुसंधान केंद्राकडून केळीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अ‍ॅप चालवले जाते. या अ‍ॅपचे नाव बनाना प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी असे आहे. हे अ‍ॅप सध्या हिंदी, इंग्रजी आणि तामिळ भाषेत उपलब्ध आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान, माती, केळीची रोपे, त्यांना पाणी कसे द्यायचे अशा सर्व गोष्टींची माहिती दिली जाते.

मेघदूत मोबाईल अ‍ॅप

मेघदूत मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत शेतीविषयीची माहिती उपलब्ध करुन दिली जाते. यामध्ये हवामान, पिकं आणि पशुपालनाच्या समस्यांचे निराकरणही केले जाते. भारतीय हवामान विभाग, भारतीय उष्णकटीबंधीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय कृषी समिती यांच्याकडून संयुक्तपणे हे अ‍ॅप चालवले जाते. दर मंगळवारी आणि शुक्रवारी अ‍ॅपवरील माहिती अपडेट केली जाते.

संबंधित बातम्या:

वाशिममध्ये ‘या’मुळे सोयाबीनचं 90 टक्के उत्पादन घटणार, तर केंद्राच्या आयातीनं दरातही मोठी घसरण

सोयाबीनवर चक्रीभुंगा, खोडमाशी, उंटअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता, कृषीतज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना ‘हा’ सल्ला

10 लाख हेक्टरवर औषधी वनस्पतींची लागवड, सरकारचा मेगा प्लॅन, शेतकऱ्यांना 5 हजार कोटी मिळणार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI