फळांच्या ‘राजा’ लाही अवकाळीचा तडाखा , हापूसचा हंगाम यंदा केवळ तीनच महिने

ग्राहकांसाठी चवदार आणि बागायतदारांसाठी उत्पन्नाच्या दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या या हापूस आंब्यावर गेल्या दोन वर्षांपासून नैसर्गिक संटक बेतत आहे. यंदा तर अवकाळी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगमातील पिकांचे आणि फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून यंदा हापूसचा हंगाम तीनच महिने होणार असल्याचे सांगितले जात आहे.

फळांच्या राजा लाही अवकाळीचा तडाखा , हापूसचा हंगाम यंदा केवळ तीनच महिने
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 2:16 PM

मुंबई : हिवाळा सुरु होताच खवय्यांना चाहूल लागते ती आंब्यांची.. त्यातही कोकणच्या हापूसला वेगळेच महत्व आहे. ग्राहकांसाठी चवदार आणि  ( Orchards) बागायतदारांसाठी उत्पन्नाच्या दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या या (Mango Season) हापूस आंब्यावर गेल्या दोन वर्षांपासून नैसर्गिक संटक बेतत आहे. यंदा तर (Untimely Rains)अवकाळी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगमातील पिकांचे आणि फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून यंदा हापूसचा हंगाम तीनच महिने होणार असल्याचे सांगितले जात आहे.

पिक काढणीच्या आणि आंब्याला मोहर लागण्याच्या दरम्यानच राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे खरिपातील उत्पादनात तर घट झाली पण फळबागांवर काय परिणाम झाले ते आता समोर येत आहेत. आंब्याचा मोहर गळाल्याने उत्पादनात घट होणार असून आवकही कमी होणार असल्याचे चित्र आहे.

गतवर्षी कोरोना तर यंदा अवकाळी

शेती उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी एक ना अनेक प्रयोग करीत आहे. मात्र, निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठेतील असमतोल याचा मोठा अडसर होत आहे. गतवर्षी कोरोनामुळे हापूस आंब्याची उलाढाल 150 कोटींनी कमी झाली होती तर एप्रिलपर्यंत आवक राहिली तर 350 कोटींहून अधिक उलाढाल होणार असल्याचे संकेत आहेत. पावसामुळे यंदा हंगाम लांबणीवर पडणार असून 15 फेब्रुवारीपासून हापूस आंब्याची आवक सुरु होईल.

अवकाळीमुळे 30 कोटींचे नुकसान

सततचा पाऊस आणि मध्यंतरी झालेल्या अवकाळीमुळे हापूसचा सुरवातीचा हंगाम हा शेतकऱ्यांच्या पदरी पडलेलाच नाही. त्यामुळे हापूस दाखल होण्यास केवळ अधिकचा वेळच लागणार नाही तर यामुळे शेतकऱ्यांनाही कोट्यावधींचा फटका बसणार आहे. वेळेत बागांची खरेदी झाली नसल्यामुळे कोकणातील बागायत शेतकऱ्यांना तब्बल 30 कोटींचे नुकसान सहन करावे लागणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलेले आहे.

आता सर्वकाही उत्पादन आणि दरावर

ज्या प्रमाणे बागायत शेतकऱ्यांचे भवितव्य आता उत्पादनावर आणि हापूसच्या दरावर राहणार आहे तीच अवस्था व्यापाऱ्यांचीही आहे. कारण ठोक व्यापाऱ्यांनी 225 हून अधिक बागा ह्या विकत घेतल्या आहेत. त्यानंतर अवकाळी पाऊस बरसला होता. किडीचा आणि रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून महागडी औषधे खरेदी करुन फवारणी करण्यात आली आहे. 25 एकरातील हापूस आंब्याची बाग फवारण्यासाठी तब्बल 70 हजाराचा खर्च आहे. त्यामुळे उत्पन्नाची सर्व गणिते ही आता होणाऱ्या उत्पादनावर आणि हापूस आंब्याला मिळणाऱ्या दरावरच ठरणार आहेत.

संबंधित बातम्या :

तोडणी सुरु असतानाच शॉर्ट सर्किटमुळे जळाला उसाचा फड, बुलडाणा जिल्ह्यातील दुर्देवी घटना

16 वर्षानंतर महाबळेश्वरात बहरली ‘सुपुष्पा’ वनस्पती, संवर्धनाच्या अनुशंगाने दोन पॉईंट पर्यटकांसाठी बंद

आवक उन्हाळी कांद्याची, दर लाल कांद्याला, काय आहे मुख्य बाजारपेठेतील चित्र?