तोडणी सुरु असतानाच शॉर्ट सर्किटमुळे जळाला उसाचा फड, बुलडाणा जिल्ह्यातील दुर्देवी घटना

उस तोडणीची लगबग..फडात कामगारांचा गोंधळ आणि उस वाहतूकीसाठी वाहनांची ये-जा. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील बायगाव येथील शेतकरी रामदास नागरे यांच्या शेतातील वातावरण हे काही वेगळेच होते. मध्यंतरी अधिकच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले होते पण ऊस बहरात होता. आता झालेले नुकसान उसातून भरुन निघणार अशी स्वप्ने नागरे रंगदत होते. मात्र, हे देखील नियतीला मान्य नव्हते. म्हणूनच उसाची तोडणी सुरु असताना तब्बल 12 एकरातील उसाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली

तोडणी सुरु असतानाच शॉर्ट सर्किटमुळे जळाला उसाचा फड,  बुलडाणा जिल्ह्यातील दुर्देवी घटना
बुलडाणा जिल्ह्यातील बायगाव शिवारातील ऊसाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यामुळे अशाप्रकारे नुकसान झाले होते

बुलडाणा : उस तोडणीची लगबग..फडात कामगारांचा गोंधळ आणि उस वाहतूकीसाठी वाहनांची ये-जा. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील बायगाव येथील शेतकरी रामदास नागरे यांच्या शेतातील वातावरण हे काही वेगळेच होते. मध्यंतरी अधिकच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले होते पण ऊस बहरात होता. आता झालेले नुकसान उसातून भरुन निघणार अशी स्वप्ने नागरे रंगदत होते. मात्र, हे देखील नियतीला मान्य नव्हते. म्हणूनच उसाची तोडणी सुरु असताना तब्बल 12 एकरातील उसाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि अवघ्या काही वेळात उसाच्या फडात उसाचीच राख झाली होती. केवळ शॉर्ट सर्किटमुळे हा प्रकार घडला आहे.

उसाची तोडणी सुरु असतानाच घडला प्रकार

बुलडाणा जिल्ह्यातील बायगाव शिवारात रामदास नागरे व त्यांच्या नातेवाईकांचा 22 एकरामध्ये ऊस होता. मध्यंतरी पावसामुळे उसाची पडझड झाली होती पण मोठ्या कष्टाने पुन्हा त्यांनी त्यांनी उभारणी केली होती. आता मुक्ताईनगर येथील कारखान्याकडून उसतोडणी सुरु होती. मात्र, शुक्रवारी रत्री उशिरा शॉर्ट सर्किटमुळे 12 एकरातील उसाला आग लागली. आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी धाव घेतली मात्र, उस आणि पाचरट यामुळे आगीवर नियंत्रण आणता आले नाही. अखेर कारखान्यावर जात असलेला उस जाग्यावरच जळाल्याने नागरे आणि त्यांच्या नातेवाईकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

नैसर्गिक संकटानंतर आता सुलतानी संकटाचा सामना

मध्यंतरी अवकाळी पावसामुळे उस साखर कारखान्यावर दाखल करणेही मुश्किल झाले होते. आता कुठे पावसाने उघडीप दिली असून उसाची तोडणी सुरु होती. यामधून का होईना चार पैसे पदरी पडतील अशी अपेक्षा नागरे आणि त्यांच्या नातेवाईकांना होती. पण उसा बरोबर पाईप, मोटारपंप व इतर साहित्याची देखील राखरांगोळी झाली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने त्वरीत पंचनामा करुन आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये तीन लाखाचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.

मदत मिळवण्यासाठी ही आहे प्रक्रिया

महावितरणच्या गलथान कारभारामुळे ऊस जळाला असेल तर शेतकऱ्याला महावितरणच्या विभागीय कार्यालयात संबंधित कागदपत्रे ही अर्जासोबत जमा करावी लागतात. यामध्ये मागील तीन वर्षाचा सातबारा उतारा, महसूल विभागाचा आणि पोलीसांनी केलेला पंचनामा, किती क्षेत्रावरील ऊस जळाला आहे त्याचे फोटो, ऊसाबरोबरच त्या क्षेत्रातील ठिंबक किंवा पाणीपुरवठा करणारे इतर साहित्य हे या घटनेत जळाले असेल तर त्याचे बील. तर साखर कारखान्यांची मागच्या तीन वर्षांची बीलंही अर्जासोबत जोडावी लागणार आहेत. शिवाय किती एकरावरचे नुकसान झाले आहे यासंदर्भात कृषी विभागाचा अहवाल. यामध्ये अंदाजे किती रुपयांपर्यंतचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे याचा उल्लेख असणे गरजेचे आहे. ही सर्व कागदपत्रे शेतकऱ्यांना अर्जासोबत जोडून दाखल करावी लागणार आहेत.

संबंधित बातम्या :

16 वर्षानंतर महाबळेश्वरात बहरली ‘सुपुष्पा’ वनस्पती, संवर्धनाच्या अनुशंगाने दोन पॉईंट पर्यटकांसाठी बंद

आवक उन्हाळी कांद्याची, दर लाल कांद्याला, काय आहे मुख्य बाजारपेठेतील चित्र?

E-Pik Pahani : शिल्लक पीकपेरा नोंदणीचे आता काय होणार?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI