AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

16 वर्षानंतर महाबळेश्वरात बहरली ‘सुपुष्पा’ वनस्पती, संवर्धनाच्या अनुशंगाने दोन पॉईंट पर्यटकांसाठी बंद

तिशय दुर्मिळ, वनस्पतीच्या प्रजातीतील वैविध्यपूर्ण आणि व अविस्मरणीय समजली जाणारी 'सुपुष्पा' वनस्पती महाबळेश्वर येथे बहरली आहे. तब्बल 16 वर्षानंतर ही वनस्पती बहरते आणि नंतर नाश पावते. पण दरम्यानच्या काळात तिचे परागीभवन व्यवस्थित होवून पुढेही अस्तित्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

16 वर्षानंतर महाबळेश्वरात बहरली 'सुपुष्पा' वनस्पती, संवर्धनाच्या अनुशंगाने दोन पॉईंट पर्यटकांसाठी बंद
महाबळेश्वर येथे 'सुपुष्पा' ही दुर्मिळ वनस्पती 16 वर्षानंतर बहरत असून तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत
| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 12:49 PM
Share

कराड : अतिशय दुर्मिळ, वनस्पतीच्या प्रजातीतील वैविध्यपूर्ण आणि व अविस्मरणीय समजली जाणारी ( Rare Plants) ‘सुपुष्पा’ वनस्पती (Mahabaleshwar) महाबळेश्वर येथे बहरली आहे. तब्बल 16 वर्षानंतर ही वनस्पती बहरते आणि नंतर नाश पावते. पण दरम्यानच्या काळात तिचे परागीभवन व्यवस्थित होवून पुढेही अस्तित्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या वनस्पतीचे परागीभवन होण्यासाठी वनविभागाकडून महाबळेश्वर मधील कॅसल व सावित्री हे दोन पॉईंट दहा दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

हिवाळ्याला सुरवात झाली असून पर्यटकांची पावली ही महाबळेश्वरकडे वळत आहेत. यंदा दाखल होणाऱ्या पर्यटकांना एक वेगळीच पर्वनी असणार आहे. कारण 16 वर्षानंतर सुपुष्पा ही वनस्पती बहरली आहे. तिचा परागीभवन होण्यासाठी काही काळ येथील दोन पॅांईंट हे 10 दिवसांसाठी बंद राहणार असले तरी त्यानंतर येथील सौंदर्य पर्यटकांना पाहता येणार आहे.

महाबळेश्वरच्या नैसर्गिक सौंदर्यात अणखीन भर

सह्याद्रीच्या डोंगररांगात आढळणाऱ्या कारवीच्या अनेक प्रजाती प्रदेशनिष्ठ आणि अनोख्या सौंदर्याने जगभर प्रसिद्ध आहेत. यातील काही प्रजातींना विशिष्ठ वर्षानंतरच फुलांचा बहर येतो. ही एक अनोखी निसर्ग साखळी आहे. तब्बल 16 वर्षानंतर फुलांचा बहर येवून नंतर मरून जाणारी कारवी वनस्पतीच्या प्रजातीतील वैविध्यपूर्ण आणि व अविस्मरणीय सुपुष्पा (पिचकोडी) सध्या महाबळेश्वरमध्ये बहरली असून महाबळेश्वरच्या निसर्ग सौंदर्यात त्यामुळे आणखी एका मनमोहक नजऱ्याची भर पडली आहे. कॅसल व सावित्री पॉइंटजवळ साधारणपणे आठवडाभरापासून सपुष्पाच्या बहराला सुरुवात झालेली आहे.

बहर झाल्यानंतर बियांमध्ये रुपांतर

गेल्या दोन दिवसांपासून सुपुष्पा वनस्पतीला बहर येण्यास सुरवात झाली आहे. आणखीन 15 दिवस तरी बहर कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर मात्र त्याचे रूपांतर बियांमध्ये होईल. 16 वर्षानंतर ही वनस्पती मरून जाते व त्याजागी बियांपासून नवीन वनस्पतीची निर्मिती होते. मात्र त्यासाठी सपुष्पाच्या फुलांचे परागीभवन होणे महत्वाचे असते. सध्या या ठिकाणी मधमाशी, फुलपाखरे व इतर घटक आपापल्या परीने परागीभवन करताना दिसत आहेत. तरी पर्यटकांची गर्दी व गोंगाट यामुळे परागीभवनात अडथळे येत असल्याने महाबळेश्वर वनपरिक्षेत्रमार्फत कॅसल व सावित्री हे दोन पॉईंट दहा दिवसांच्या कालावधीसाठी बंद ठेवण्यात आल्याचे मुख्य वनसंरक्षक कार्यालय कोल्हापूर वनवृतचे उपजीविका तज्ञ डॉ.योगेश फोंडे यांनी सांगितले.

निसर्गाचा अनमोल ठेवा

तब्बल 16 वर्षानंतर या सुपुष्पा वनस्पतीला बहर येतो आणि नंतर लगेच ही वनस्पती मरण पावते. निसर्गाची अजब कृपा आहे. त्यामुळेच ‘जैव विविधता’ संवर्धनाचा भाग म्हणून हे कॅसल व सावित्री हे दोन पॉईंट बंद ठेवण्यात आले आहेत. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मुख्य वनसंरक्षक डॉ.व्ही.क्लेमेंट बेन आणि साताऱ्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांचे मार्गदर्शन होत आहे. दरम्यान मधमाशी, फुलपाखरे व अन्य किटकांमार्फत सुपुष्पा वनस्पतीच्या फुलांचे व्यवस्थित परागीकरण होण्यासाठी मुख्य वनसंरक्षक कार्यालय कोल्हापूर येथील उपजीविका तज्ञ डॉ.योगेश फोंडे यांच्याकडून नियोजन करण्यात आले आहे. महाबळेश्वरचे परिक्षेत्र वनाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, वनपाल सहदेव भिसे,वनरक्षक लहू राऊत आणि संयुक्त वनव्यवस्थापन महासमिती महाबळेश्वर आदींचा मोहिमेत सहभाग आहे.

संबंधित बातम्या :

आवक उन्हाळी कांद्याची, दर लाल कांद्याला, काय आहे मुख्य बाजारपेठेतील चित्र?

E-Pik Pahani : शिल्लक पीकपेरा नोंदणीचे आता काय होणार?

कापसाला नव्हे तर बोंडअळीला पोषक वातावरण, शेतकऱ्यांकडे आता एकच पर्याय

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.