अवकाळी पावसाने कांदा सडला बांधावरच, शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान

| Updated on: May 04, 2023 | 2:39 PM

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला. दारव्हा तालुक्यात कांद्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. आता हा कांदा काढला आणि शेताच्या बांधावर ठेवला आहे.

अवकाळी पावसाने कांदा सडला बांधावरच, शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान
yavatmal (
Image Credit source: tv9marathi
Follow us on

यवतमाळ : खरीप आणि रब्बी (rabi season) हंगामात झालेले नुकसान भरपाईसाठी यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी (farmer) उन्हाळ्यात कांद्याची लागवड केली. मात्र आता काढलेला कांदा अवकाळी पावसाने शेतातच सडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला. दारव्हा तालुक्यात कांद्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. आता हा कांदा काढला आणि शेताच्या बांधावर ठेवला आहे. दरम्यान अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली. येवढा पाऊस झाला की शेतात पाणी साचले. त्यामुळे कांदा शेतात पुर्णपणे बुडाला असून सडत आहे. या सगळ्याचा फटका शेतकऱ्यांना (farmer) बसला आहे.

पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला

नांदेडच्या देगलूर तालुक्यातील खुतमापूर इथे आज सकाळच्या सुमारास पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळात झाड विजेच्या खांबावर कोसळले. त्याचवेळी सुरेश बडगे हा शेतकरी शेतात काम करीत होता. त्यांना विजेचा शॉक लागला, त्यामुळे त्यांचा जाग्यावरच मृत्यू झाला. या घटनेने खुतमापूर गावावर शोककळा पसरली आहे. तर महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करत कुटुंबाने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

बाजारपेठेत आंब्याची आवक

परळीच्या बाजारपेठेत आंब्याची चांगली आवक होत आहे. ठिकठिकाणी शहरात विविध प्रजातीचे आंब्याचे स्टॉल्स पाहायला मिळत आहेत. 80 रुपयांपासून दोनशे रुपये किलोपर्यंत आंब्याची विक्री होते आहे. त्यामध्ये केशरी, दशेहरी, लंगडा आणि गावरान आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ऐन बहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही अंशी का होईना याचा परिणाम आंब्याच्या आवकेवर जाणवू लागला आहे. मात्र परळीकरांना चवीने आंब्याची चव चाखायला मिळतेय.

हे सुद्धा वाचा

दीड लाख शेतकरी वंचित राहण्याची शक्यता

प्रधान किसान सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा चौदावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातील जवळपास दीड लाख शेतकरी यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. कारण गेल्या वर्षभरापासून वारंवार सूचना देऊनही या शेतकऱ्यांनी पात्रतेची पूर्तताच केली नाही. या शेतकऱ्यांना आता शेवटची पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ई-केवायसी, आधार संलग्नता, भूमी अभिलेख नोंदणी तसेच डाटा दुरुस्ती अशा प्रकारची पूर्तता शेतकऱ्यांनी करणे आवश्यक आहे.

अनेक दिवसांपासून शेतकऱ्याचा कापूस हा घरातच पडून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 80 टक्के कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अद्यापही आपला कापूस विकलेला नाही शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. त्यामुळे कापूस घरात पडून असल्यामुळे खाजीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.