Onion Crop : कांदा दराचा वांदा मिटवण्यासाठी शेतकऱ्यांची कांदा दही हंडी, दोन संघटनांचा वाढीव दरासाठी संघर्ष

| Updated on: Aug 23, 2022 | 3:40 PM

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कांदा प्रश्न पेटला आहे.शेतकरी संघटने पाठोपाठ प्रहार शेतकरी संघटना देखील रस्त्यावर उतरली असून कांद्याला किमान प्रति क्विंटल 3 हजार रुपये भाव द्यावा अशी मागणी आहे. त्याअनुशंगाने बागलाण-सटाणा मार्गावर रस्ता रोको करून कांदा दही हंडी आंदोलन केले.यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत किती वर्षे आम्ही भाव घसरणीला तोंड द्यावे असा प्रश्न उपस्थित केला.

Onion Crop : कांदा दराचा वांदा मिटवण्यासाठी शेतकऱ्यांची कांदा दही हंडी, दोन संघटनांचा वाढीव दरासाठी संघर्ष
कांद्याच्या वाढीव दरासाठी प्रहार शेतकरी संघटनेने आंदोलन केले
Follow us on

नाशिक : गेल्या पाच महिन्यांपासून (Onion Rate) कांदा दराची घसरण ही सुरुच आहे. गत खरीप हंगामातील कांदा काढणीपासून लागलेली उतरती कळा अद्यापही कायमच आहे. (Farmer) शेतकऱ्यांनी अधिकचा दर मिळेल म्हणून (Onion Stock) कांदा साठवणूक केली, शिवाय वेळोवेळी आंदोलने आणि मोर्चेही काढले मात्र कांद्याच्या दरात सुधारणा ही झालेलीच नाही. आता शेतकऱ्यांच्या मदतीला संघटनाही धावून येत आहेत. यापूर्वीच शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते आता प्रहार शेतकरी संघटनेने तर शेतकऱ्यांना घेऊन कांदा दही हंडीच केली आहे. अशा अनोख्या आंदोलनानंतर तरी कांद्याच्या दरात सुधारणा होईल असा आशावाद आहे. सध्या कांद्याला 6 रुपये ते 14 रुपयांपर्यंतचा दर आहे. पण कांद्याला किमान 30 रुपये किलो दर मिळावा अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.

शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कांदा प्रश्न पेटला आहे.शेतकरी संघटने पाठोपाठ प्रहार शेतकरी संघटना देखील रस्त्यावर उतरली असून कांद्याला किमान प्रति क्विंटल 3 हजार रुपये भाव द्यावा अशी मागणी आहे. त्याअनुशंगाने बागलाण-सटाणा मार्गावर रस्ता रोको करून कांदा दही हंडी आंदोलन केले.यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत किती वर्षे आम्ही भाव घसरणीला तोंड द्यावे असा प्रश्न उपस्थित केला. आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी देखील सहभागी झाले होते.

काय आहे सध्या दराची स्थिती?

गेल्या पाच महिन्यापासून कांदा दरातील घसरण ही सुरुच आहे. शेतकऱ्यांना केवळ नाफेडकडून खरेदी सुरु असताना दिलासा मिळाला होता. नाफेडचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर त्यांनी खरेदीही बंद केली आहे. त्यामुळे पुन्हा दरात घसरण सुरु झाली आहे. सध्या चांगल्या प्रतिच्या कांद्याला 14 रुपये तर कमाल दर हा 6 रुपये असा आहे. त्यामुळे गेल्या पाच महिन्यापासून कांदा हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. याबाबत सरकारकडूनही कोणते धोरण ठरत नाही. त्यामुळे आता सरकारने हस्तक्षेप करुन कांद्याचे दर निश्चित करावे अशी मागणी होत आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?

शेतकऱ्यांकडे कांदा उत्पादन होताच दर हे घसरतात शिवाय हे दरवर्षीचे आहे. कांदा हे नावालाच नगदी पीक आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना नव्हे तर व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांनाच होत आहे. त्यामुळे कांद्याला किमान 30 रुपये किलो असा दर ठरवून द्यावा शिवाय त्यावरील अनुदान हे वाढवण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. आतापर्यंत कांदा उत्पादक संघ, शेतकरी संघटना आणि आता प्रहार शेतकरी संघटनाही कांद्याला चांगला दर मिळावा म्हणून लढा उभा करीत आहेत.