कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव, असे करा नियंत्रण म्हणजे होईल उत्पादनात वाढ

| Updated on: Oct 02, 2021 | 1:46 PM

दा निसर्गाच्या अवकृपेमुळे सोयाबीन बरोबरच कपाशीवर सुद्धा धोक्याची घंटा आहे. सोयाबीनचे पावसाने नुकसान झाले आहे तर कापसाला बोंडआळीचा धोका निर्माण झाला आहे. हे पीक ऐन फुलोऱ्यात असतानाच या किडीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. याचे वेळेत योग्य नियोजन केले नाही उत्पादनावर परिणाम होणार आहे.

कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव, असे करा नियंत्रण म्हणजे होईल उत्पादनात वाढ
कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे
Follow us on

लातूर : सोयाबीन पाठोपाठ खरीपातील महत्वाचे पीक म्हणजे (Cotton) कापूस आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात कापूस लागवडीला सुरवात होते. राज्यात तब्बल 40 लाख हेक्टरावर कपाशीची लागवड करण्यात आलेली आहे. मात्र, यंदा निसर्गाच्या (Heavy Rain) अवकृपेमुळे सोयाबीन बरोबरच कपाशीवर सुद्धा धोक्याची घंटा आहे. सोयाबीनचे पावसाने नुकसान झाले आहे तर कापसाला बोंडआळीचा धोका निर्माण झाला आहे. हे पीक ऐन फुलोऱ्यात असतानाच या किडीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. याचे वेळेत योग्य नियोजन केले नाही उत्पादनावर परिणाम होणार आहे.

राज्यात पावसाने थैमान घातलेले आहे. शिवाय सध्या ढगाळ वातावरण आणि होत असलेल्या पावसामुळे कपाशीवर मावा, तुडतुडे, बोंडअळी इत्यादी किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी 2002 मधे बीटी जनुक असलेल्या वाणांचा वापर भारतामध्ये सुरु झाला होता. मात्र, बोंड अळीचा प्रादुर्भाव हे बिटी कपाशीवर सुध्दा दिसून येत आहे. त्यामुळे फुलोऱ्यात व बोंड अवस्थेत असलेले कापूस पदरात पाडून घ्यावयचा असेल तर शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

बोंअळीच्या प्रादुर्भावाची लक्षणे

प्रादुर्भाव बोंडअळीमध्ये डागाळलेला कापूस व अर्धवट कुरतडलेल्या बिया असतात..यामध्ये बोंडे ही पूर्णपणे उमलत देखील नाहीत. शिवाय नुकसान झालेल्या बोंडात बुरशीचे प्रमाण हे जास्त असते.

कीड प्रादुर्भावाचे निदान

कापूस 40 ते 45 दिवसाचा झाल्यावर एकरी दोन याप्रमाणे कामगंध सापळे उभारण्यात यावेत.. सापळ्यात अडकलेल्या पतंगाची संख्या आठवड्यातून एकदा मोजणे गरजेचे आहे. पतंगाची संख्या अधिक असेल तर शिफारस करुन दिल्याप्रमाणे किटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे. डोमकळ्या दिलसाच शेतकऱ्यांनी त्या खोडून टाकणे आवश्यक आहे. हिरव्या बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकरातील काही बोंडांची पाहणी करुन त्या हिरव्या बोंडावर जर किडीचा प्रादुर्भाव असेल तर ती बोंडे ही काढून टाकणे हाच पर्याय शेकऱ्यांसमोर राहणार आहे.

कपाशीवरील बोंड आळीचे एकात्मिक व्यवस्थापन

कपाशीला पाते लागण्यास सुरुवात झाल्यानंतर हेक्टरी 5 कामगंध सापळे कपाशी पिकामध्ये लावावे.

शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून नत्र खतांचा संतुलित वापर करावा.

कपाशीला पाती लागल्यानंतर 7 ते 8 वेळा पिकांमध्ये दर 10 दिवसानंतर ट्रायकोकार्ड एकरी 3 या प्रमाणात लावावे म्हणजे बोंडांचा अंडी अवस्थेत नायनाट होईल.

फुलाच्या अवस्थेत गुलाबी बोंड आळी ज्या फुलावर झालेली आहे ती फुले नष्ट करावित म्हणते इतर कपाशी पिकावर त्याचा प्रादुर्भाव होणार नाही.

जैविक नियंत्रण:-

एच. एन.पी. व्ही. 500 एल . ई प्रति हेक्टर क्रायसोपा अंडी 50000 प्रति हेक्टर

निंबोळी अर्क 5% फवारणी

बिव्हेरिया बॅसियाना 1.15 डब्यू पी 50 ग्रॅम प्रति 10 लिटर (Pest infestation on cotton, appropriate measures needed for farmers)

संबंधित बातम्या :

सोयाबीनच्या दराला उतरती कळा, शेतकऱ्यांनो ‘या’ गोष्टींची अंमलबजावणी हाच पर्याय

कथा साखर कारखान्याची, व्यथा शेतकऱ्यांच्या थकीत ‘एफआरपी’ रकमेची

वेळप्रसंगी निकष बदला, पण नुकसानची नोंद घ्या : पालकमंत्री देशमुख