वेळप्रसंगी निकष बदला, पण नुकसानची नोंद घ्या : पालकमंत्री देशमुख

पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधवर पायी मार्गस्थ होणेही मुश्किल होत आहे. त्यामुळे विमा कंपन्यांनी त्यांची नियमावली बाजूला सारत शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची नोंद घेणे आवश्यक असल्याचे मत लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

वेळप्रसंगी निकष बदला, पण नुकसानची नोंद घ्या : पालकमंत्री देशमुख
संग्रहीत छायाचित्र

लातूर : पावसाने मराठवाड्यातील खरीपातील पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधवर पायी मार्गस्थ होणेही मुश्किल होत आहे. त्यामुळे विमा कंपन्यांनी त्यांची नियमावली बाजूला सारत शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची नोंद घेणे आवश्यक असल्याचे मत लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केले आहे. पावसाने उघडीप देऊन तीन दिवसाचा कालावधी लोटला आहे. असे असतनाही शेतामध्ये पाणी साचले असून पंचनामे करणे देखील मुश्किल होत आहे. त्यामुळे निकष बाजूला सारुन जे वास्तव आहे त्याची नोंद करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यात मागील पाच दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यासाठी विमा कपनीने निकष बाजूला ठेवून मदत करावी शिवाय शेतकऱ्यांना शासन कटीबध्द असल्याचे मत वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिक तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केले. लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पावसाने पिकाचे नुकसान झालेले आहे.

निलंगा तालुक्यातील गौर, मसलगा, ताजपूर, ढोबळेवाडी येथे मांजरा नदीच्या पुरामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पीकाच्या नुकसानीची पाहणी केली. या प्रसंगी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, प्रदेश सचिव अभय साळुंके, उपविभागीय कृषि अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा कृषि अधिक्षक दत्तात्रय गावसाने उपस्थित होते.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास शासन कटीबध्द आहे. पीक विम्याचे अर्ज स्विकरावेतपीक विमा संदर्भातील ऑनलाईन व ऑफ लाईन पध्दतीने पीक विमा संदर्भात संबंधीतांनी गाव पातळीवर अर्ज स्वीकारावे अशा सुचना पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या. यावेळी संबंधीत विभागाचे अधिकारी, कृषि सहायक, ग्रामसेवक, तलाठी,ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.

सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका

खरीपात सोयाबीन हे मुख्य पीक आहे. शेतकऱ्यांनी अधिकच्या उत्पादनाच्या दृष्टीने सोयाबीनचा पेरा केला होता. मात्र, पीक काढणीच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने मोठे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यात मांजरा – तेरणा नदीचा संगम असून या ठिकाण लगतच्या शेतामध्ये पाणी साचलेले आहे. पावसाने उघडीप देऊन तीन दिवस उलटले तरी पाणी हे शेतामध्ये साचलेले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पिक विमा कंपनीचे प्रतिनीधी बांधवार जात आहेत. पण पावसाचे पाणी असल्याने पंचनामे करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नियम बाजूला सारत हे नुकसानीची नोंद आवश्यक आहे.

80 टक्के पंचनामे पूर्ण, विमा कंपनीचा दावा

जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने हजेरी लावली होती. त्यानुसार नुकसानीच्या तक्रारी दाखल होताच पंचनामे करण्यास सुरवात झाल्याचे विमा प्रतिनीधी संतोष जाधव यांनी सांगितले होते. त्यामुळे 80 टक्के पंचनामे पूर्ण झाले होते आता झालेल्या पावसामुळे नुकसानीच्या क्षेत्रात भर पडलेली आहे. (Change the rules from time to time, but it is necessary to take note of the losses suffered by the farmers)

संबंधित बातम्या :

राज्य सरकराचा शेतकऱ्यांना दिलासा : विम्यापोटी 973 कोटी 16 लाखाचा निधी विमा कंपन्यांना वर्ग

हातातोंडाशी आलेलं सोयाबीन मातीमोल, रब्बीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर दुहेरी संकट, सॅम्पल पंचनामे करा, सेना आमदाराचं मुख्यमंत्र्यांना साकडं

कृषी क्षेत्रामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल : केंद्रीय कृषी मंत्री

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI