हातातोंडाशी आलेलं सोयाबीन मातीमोल, रब्बीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर दुहेरी संकट, सॅम्पल पंचनामे करा, सेना आमदाराचं मुख्यमंत्र्यांना साकडं

मराठवाडा आणि उस्मानाबादमध्ये गुलाब चक्रीवादळामुळं झालेल्या मुसळधार पावसानं मोठं नुकसान झालेलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यीतील 2 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय. एकूण नुकसानापैकी 90 टक्के पीक हे सोयाबीनचं होतं. सोयाबीनच्या शेतात पुराचं पाणी घुसल्यानं सगळं पीक वाया गेलं आहे.

हातातोंडाशी आलेलं सोयाबीन मातीमोल, रब्बीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर दुहेरी संकट, सॅम्पल पंचनामे करा, सेना आमदाराचं मुख्यमंत्र्यांना साकडं
सोयाबीनचं नुकसान


उस्मानाबाद: मराठवाडा आणि उस्मानाबादमध्ये गुलाब चक्रीवादळामुळं झालेल्या मुसळधार पावसानं मोठं नुकसान झालेलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यीतील 2 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय. एकूण नुकसानापैकी 90 टक्के पीक हे सोयाबीनचं होतं. सोयाबीनच्या शेतात पुराचं पाणी घुसल्यानं सगळं पीक वाया गेलं आहे. खराब झालेलं पीक शेतातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना खर्च करावा लागतोय. हातातोंडाशी आलेलं सोयाबीन हातचं गेलं आहे. रब्बी हंगामातील पेरणीसाठी सडलेलं आणि नुकसान झालेलं सोयाबीनचं पीक शेताबाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसतेय. शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी पीक विमा कंपन्यांनी सॅम्पल पंचनामे करावेत अशी मागणी केली आहे. नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय आणि पीक विमा कंपन्यांकडं मनुष्यबळ नसल्यानं पीक विमा योजनेतील कंपन्यांची वाट न पाहता सॅम्पल पंचनामे करावेत, असं कैलास पाटील म्हणाले.

खराब झालेलं पीक बाहेर काढण्यासाठी आर्थिक झळ

उस्मानाबाद जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे खराब झालेले पीक काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे कुजलेले पीक काढण्यासाठी मजूरा़ना मजुरी द्यावी लोगतेय. एकीकडे शेतकऱ्यांचे विमा कंपन्यांनी पंचनामे देखील केले नाहीत. आणि दुसरीकडे हे खराब पीक काढणीचा खर्च शेतकऱ्यांना सोसावा लागतोय.

सॅम्पल पंचनामे करा

प्रत्येक शेतात जावून पंचनामे करण्यापेक्षा सॅम्पल पंचनामे करा , मनुष्यबळ नसल्याने बांधावर जाऊन सर्व पंचनामे करणे शक्य नाही, असं शिवसेना आमदार कैलास पाटील म्हणाले आहेत. अडीच लाख शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर विम्यासाठी अर्ज केलेत. विमा कंपनीकडे लोक नाहीत त्यामुळे रोज केवळ 9 हजार पंचनामे केले जातात. शेतकऱ्यांनी पंचनामे करण्यासाठी विमा कंपनी यांची वाट पाहायची का ?, असा सवाल कैलास पाटील यांनी केला आहे.

शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी 6 लाख शेतकऱ्यांपैकी अडीच लाख अर्ज केले आहेत. एकूण साडेचार लाख लोक अर्ज करतील, असं म्हटलंय. एनडीआरएफच्या निकषात बदल करावेत, नदीकाठी शेती माती वाहून गेली त्यात फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत केली जाते , बहुभुधारक शेतकऱ्यांना अन्याय होतोय हे बदलणे गरजेचे, असल्याचं कैलास पाटील म्हणाले आहेत. शेतमजूर यांच्या पशुधनाच नुकसान झाले तर मदत मिळत नाही , फक्त शेतकऱ्यांच्या पशुचे नुकसान झाले तरच मदत केली जाते, हा निकष देखील बदलला जावा, असं कैलास पाटील म्हणाले.

उस्मानाबादमध्ये 278 कोटींचे नुकसान

उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीने 2 दिवसात 278 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल महसूल विभागाने तयार केला असून तो सरकारकडे पाठविला आहे. शेती,रस्ते,जनावरे,घरांची पडझड झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले असून त्यांच्या मदतीकडे नजरा लागल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आजही आहे तर पावसामुळे सोयाबीनला शेंगा उगवण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकरी संकटात आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांशी केली आहे

इतर बातम्या:

VIDEO: अनिल परबांच्याविरोधात रामदास कदमांनी मटेरियल पुरवलं का? किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया

Defamation Case : शिल्पा शेट्टीला कोर्टाकडून दिलासा मिळणार, मीडिया प्लॅटफॉर्मचे दोन भागांमध्ये विभाजन करण्याचे आदेश

osmanabad soybean crop loss farmers facing economic problem crop insurance companies limitations came forward shivsena MLA Kailas Patil demand sample survey

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI