Crop Damage : नागपूर विभागातील नुकसानीचा सर्व्हे पूर्ण, शेतकऱ्यांचे लक्ष आता सरकारच्या मदतीकडे

| Updated on: Aug 05, 2022 | 2:16 PM

दरवर्षी मराठवाडा आणि विदर्भाला मोठ्या पावसाची प्रतिक्षा असते. यंदा मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून पावसाने सुरु केलेला धुमाकूळ अद्यापही कायम आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणी झाली की पिके पाण्यात आहेत. पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून आता उत्पादनाच्याही आशा मावळल्या आहेत. विदर्भात 1 लाख 35 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकासन झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे नागपूर विभागात झाले आहे.

Crop Damage : नागपूर विभागातील नुकसानीचा सर्व्हे पूर्ण, शेतकऱ्यांचे लक्ष आता सरकारच्या मदतीकडे
अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून विदर्भातील पंचनाम्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे.
Follow us on

नागपूर : अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे (Kharif Season) खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून राज्यात उघडीप दिलेल्या (Monsoon) मान्सूनचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे यंदा खरीप पाण्यात अशीच स्थिती आहे. जुलैच्या अंतिम आठवड्यापर्यंत नागपूर विभागात पावसाने थैमान घातले होते. शेतकऱ्यांना  (Financial assistance)आर्थिक मदतीसाठी आवश्यक असलेल्या पंचनाम्यांचे काम पूर्ण न झाल्याने मदतीमध्ये अडचणी निर्माण होत होत्या. मात्र, हे काम अंतिम टप्प्यात असून दोन दिवसांमध्ये नागपूर विभागामध्ये किती क्षेत्रावरील नुकसान झाले आहे याचा अहवाल दिला जाणार असल्याचे प्रभारी विभागीय आयुक्त राधाकृष्ण बी यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता तरी मदतीचा मार्ग मोकळा होईल अशी आशा आहे.

सर्वाधिक नुकसान विदर्भात

दरवर्षी मराठवाडा आणि विदर्भाला मोठ्या पावसाची प्रतिक्षा असते. यंदा मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून पावसाने सुरु केलेला धुमाकूळ अद्यापही कायम आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणी झाली की पिके पाण्यात आहेत. पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून आता उत्पादनाच्याही आशा मावळल्या आहेत. विदर्भात 1 लाख 35 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकासन झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे नागपूर विभागात झाले आहे. नागपूर विभागातील गडचीरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात अतिृष्टीचा मोठा फटका बसलाय. धान, कापूस, तूर, सोयाबीन यासह भाजीपाला आणि फळबागा ह्या पाण्यात आहेत.

सर्व्हे पूर्ण, दोन दिवसांमध्ये अहवाल सादर

शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी जो पंचनामा महत्वाचा आहे ती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून कृषीसह महसूल विभागातील अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर आणि गावोगावी नुकसानीचे पंचनामे करीत आहेत. शिवाय साचलेल्या पाण्यामुळे दुर्गम भागांमध्ये मार्गस्थ होणेही मुश्किल झाले होते. त्यामुळे पंचनाम्यास उशिर लागला असला तरी आता 99 सर्व्हे पूर्ण झाले असून दोन दिवसांमध्ये नुकसानीचा अहवाल हा सादर केला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांचे लक्ष आर्थिक मदतीकडे

सततच्या पावसामुळे पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण दुबार पेरणी करुनही पिके पाण्यात आहे. त्यामुळे यंदा पीक नुकसानीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवढेच नाही तर विरोधी पक्षनेते अजित पवार हे देखील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी विदर्भात दाखल झाले होते. त्यामुळे भरीव मदत मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. विरोधकांनी खरिपाच्या नुकसानीपोटी हेक्टरी 75 हजार तर फळबागांच्या नुकसानीबद्दल 1 लाख 50 हजाराच्या मदतीची मागणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी काय पडणार हे लवकरच समोर येईल.