Positive News : महाराष्ट्रीयन केळीचा दर्जाही सुधारणार अन् मागणीही वाढणार, इंदापूरात साकारला जातोय प्रयोग..!

यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे केळी उत्पादनात घट झाली असली वाढीव दराचा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी वातावरणातील बदलामुळे रोगराईचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे घटणारे उत्पादन भरुन काढण्यासाठी ही नॅनो फर्टीलायझर टेक्नॉलॉजी उपयोगी पडणार आहे. उत्पादन तर वाढेलच पण केळीचा दर्जाही यामुळे सुधारणार आहे.

Positive News : महाराष्ट्रीयन केळीचा दर्जाही सुधारणार अन् मागणीही वाढणार, इंदापूरात साकारला जातोय प्रयोग..!
केळी बागांवर नॅनो फर्टीलायझऱचा प्रयोग याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ट्रायडेंट कंपनीचे अधिकारी
राहुल ढवळे

| Edited By: राजेंद्र खराडे

Aug 03, 2022 | 8:18 PM

इंदापूर : केवळ (Orchard) फळबागांच्या क्षेत्रात वाढ होऊन उपयोग नाही तर त्याची गुणवत्ताही असणे गरजेचे आहे. क्वांटिटी बरोबर क्वालिटी दिली तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये दुपटीने वाढ होते. त्यामुळे इंदापूरात एक प्रायोगिक तत्वावर प्रयोग केला जात आहे. परदेशातील (Quality of bananas) केळीला जी गुणवत्ता असते ती महाराष्ट्रायीन केळीला मिळावी यासाठी (Trident Company) ट्रायडेंट कंपनी मैदानात उतरली आहे. यासाठी आवश्यक असलेली नॅनो फर्टीलायझर टेक्नॉलॉजीचा वापर आता महाराष्ट्रातील केळीवर केला जात आहे. या प्रयोग यशस्वी झाला तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ तर होईलच पण राज्यातील केळीचा लौकीक सबंध देशात होईल. त्याअनुशंगाने ट्रायडेंट कंपनीचे अधिकारी कर्मचारी हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहेत.

नेमकी काय आहे पध्दत?

फर्टीलायझर्स मध्ये टॅबलेट तंत्रज्ञान वापरून त्या टॅबलेट पहिल्या महिन्यात केळीच्या रोपालगत एकदा नंतर साठ दिवसानंतर केळी झाडाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण तीन टॅबलेट मध्ये केळीचे उत्पादन पूर्ण होणारा असून या माध्यमातून नियमित केळी उत्पादनापेक्षा मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन वाढेल असा विश्वास कंपनीच्या वतीने व्यक्त केला. याचवेळी सध्या केळी पिकासाठी वापरण्यात येणारी इतर खते पहिल्यांदा पंचवीस टक्के व नंतर टप्प्याटप्प्याने कमी कमी करत आणून फक्त नॅनो फर्टीलायझर्स तत्त्वावर आधारितच केळीचे उत्पादन अधिक उत्पादन मिळेल असा विश्वास कंपनीचे मुख्य वैज्ञानिक संचालक श्रीहरी पवार यांनी व्यक्त केला.

इंदापूरचीच निवड का?

केळीचे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या इंदापूर, माढा, करमाळा या तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कंपनी सेवा पुरवत आहे, यामध्ये कंदर येथील केळी उत्पादक शेतकरी ॲड.जे.के. बसळे यांचे 3 एकर केळीच्या शेतीमध्ये ट्रायडेंट ऍग्रो च्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानावर आधारित केळीचे उत्पादन प्रायोगिक तत्त्वावर घेतले जात असून यासाठी शेतकऱ्याला कंपनीकडून मोफत नॅनो फर्टीलायझर तयार करून देण्यात आले आहेत.

यंदा केळीला विक्रमी दर

निसर्गाच्या लहरीपणामुळे केळी बागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली असून आता मागणीही वाढत आहे. जळगाव आणि महाराष्ट्रातील केळीला उत्तरेतील राज्यातून अधिकची मागणी आहे. असे असले तरी सध्या 2 हजार 500 रुपये क्विंटल असा दर आहे. शिवाय श्रावण महिन्यात केळी दरात अशीच वाढ राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. हा प्रयोग जर यशस्वी झाला तर हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें