Kharif Season : बळीराजाही ‘कमर्शियल’, अधिकचा दर बाजारात तेच पीक वावरात, भाजीपाल्याने मार्केट मारलं.!

सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे तर त्यापाठोपाठ कापसू. गतवर्षी कापसासाला 10 वर्षातील विक्रमी दर मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा कापसावर भर दिला आहे. गतवर्षी महाराष्ट्रात सोयाबीनचा पेरा 43 लाख 83 हजार हेक्टरावर झाला होता तर यंदा 45 लाख 62 हजार हेक्टरावर झाला आहे. दुसरीकडे कापसाच्या क्षेत्रात तब्बल 6 लाख हेक्टराने वाढ झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Kharif Season : बळीराजाही 'कमर्शियल', अधिकचा दर बाजारात तेच पीक वावरात, भाजीपाल्याने मार्केट मारलं.!
यंदाच्या खरिपात सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
Image Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे

|

Aug 02, 2022 | 9:38 AM

मुंबई : भारतामधील शेती ही पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. शेती व्यवसायातून नुकसान असो की फायदा हे सर्व (Monsoon Rain) मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. यंदा त्याचा अनुभव केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच नाहीतर देशभर आलेला आहे. असे असतानाही शेतकऱ्यांनी उत्पन्नाच्यादृष्टीने ज्या पिकांना बाजारात अधिकचा दर तेच पीक वावरात असेच धोरण अवलंबले आहे. त्यामुळेच (Pulses sow) तूर, उडीद आणि मूगाचा पेरा घटला असून (Cotton & Soybean) कापूस आणि सोयाबीन या हुकमी पिकावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. पावसाचा परिणाम पीक वाढीवर झालेला असला तरी या दोन मुख्य पिकातूनच उत्पादन मिळवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. बाजारपेठेतील डाळींचे घटते दर आणि पावसामुळे लांबलेल्या पेरण्यांचा परिणाम तूर, उडीद आणि मूगाच्या पेऱ्यावर झालेला आहे.

तुरीच्या पेऱ्यात घट, मुगावर भर

डाळीमध्येही शेतकऱ्यांनी दरवर्षी ज्या तुरीच्या पेऱ्यात वाढ होत असते तिला बाजूला सारुन मूगावर भर दिला आहे. गतवर्षी देशात तुरीचा पेरा 41 लाख 75 हजार हेक्टरावर झाला होता. तर यंदा 36 लाख 11 हजारावर झालेला आहे. तर मुगाच्या पेऱ्यात 4 लाख हेक्टराने वाढ झालेली आहे. हिरव्या मुगाचे क्षेत्र 25 लाख हेक्टरावरुन 29 लाख हेक्टरावर गेलेले आहे. डाळीचे क्षेत्र हे महाराष्ट्रात नव्हे तर राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात वाढलेले आहे.

सोयाबीन, कापसावरच शेतकऱ्यांचा भर

सोयाबीन आणि कापूस हे खरिपातील हुकमी पीक मानले जात आहे. शिवाय याच पिकांना पोषक वातावरण आहे. त्यामुळे पेरण्या लांबल्या, वेळप्रसंगी दुबारचे संकट ओढावले पण राज्यातील शेतकऱ्यांनी या दोन पिकावरच भर दिला. आधारभूत किंमतीपेक्षा अधिकचा दर आणि अधिकचे उत्पादन ही दोन्हीही कारणे सोयाबीन आणि कापसाचे क्षेत्र वाढण्यासाठी कारणीभूत आहेत. गतवर्षी तर कापसाला 14 हजार रुपये क्विंटल असा विक्रमी दर मिळाला तर सोयाबीनला 7 हजार 300 रुपये क्विंटलपर्यंतचा दर मिळाला होता.

सोयाबीन, कापसाच्या क्षेत्रात वाढ

सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे तर त्यापाठोपाठ कापसू. गतवर्षी कापसासाला 10 वर्षातील विक्रमी दर मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा कापसावर भर दिला आहे. गतवर्षी महाराष्ट्रात सोयाबीनचा पेरा 43 लाख 83 हजार हेक्टरावर झाला होता तर यंदा 45 लाख 62 हजार हेक्टराव झाला आहे. दुसरीकडे कापसाच्या क्षेत्रात तब्बल 6 लाख हेक्टराने वाढ झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात गतवर्षी तुरीचा पेरा 12 लाख 51 हजार हेक्टरावर झाला होता तर यंदा 11 लाख 12 हजार हेक्टरावर झाला आहे. त्यामुळे ज्या पिकातून अधिकचे उत्पादन त्याच पिकावर शेतकऱ्यांचा भर असे चित्र आहे.

आवक वाढूनही भाजीपाल्याचा तोरा

नवी मुंबई मार्केटमध्ये भाजीपाल्यांची आवक वाढली आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच आवकमध्ये फरक पडला आहे. असे असले तरी अधिकच्या मागण्यामुळे भाजीपाल्याचा तोरा हा कायम आहे. भाजीपाल्याला आता विक्रमी दर मिळत आहे. त्यामुळेच प्रतिकीलो भाजीपाला 5 ते 10 रुपयांनी महागलेला आहे. तर दुसरीकडे सततच्या पावसामुळे आता उत्पानदनावर परिणाम होणार अससल्याचे सांगितले जात आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें