हवामानाचा ‘हा’ अंदाज राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा…कारण

| Updated on: Oct 16, 2022 | 1:22 PM

आधीच संकटात सापडलेल्या बळीराजासाठी आणखी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. हवामान तज्ज्ञांकडून पावसाचा नवा अंदाज वर्तवण्यातआला आहे.

हवामानाचा हा अंदाज राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा…कारण
Image Credit source: TV9 Network
Follow us on

मुंबई :  आधीच संकटात सापडलेल्या बळीराजासाठी (Farmers) आणखी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. यावर्षी राज्यासह देशभरात डिसेंबरपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज (Rain Forecast) वर्तवण्यात आला आहे. देशाच्या विविध भागात कमी दाबाचे पट्टे निर्माण होणार आहेत. त्यामुळे यंदा राज्यसह देशभरात डिसेंबरपर्यंत पाऊस (Rain) पडणार आहे. या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. दक्षिण आशियाई हवामान परिषदेत हवामान तज्ज्ञांकडून डिसेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पिकांना फटका बसणार

हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार जर यंदा डिसेंबरपर्यंत पाऊस झाला तर त्याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे.  प्रमुख्याने कापूस, सोयाबीन, बाजरी ही पिके सकंटात सापडणार आहेत. तसेच गहू आणि ढगाळ वातावणामुळे हरभारा या पिकांना देखील कमी अधिक प्रमाणात फटका बसू शकतो. ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका

दरम्यान यंदा यापूर्वी शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच काही भागात अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले, पिके खराब झाल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली होती. या संकाटातून सावरल्यानंतर पुन्हा एकदा काही दिवसांपासून राज्यत पाऊस सुरू झाला आहे. या पावसाचा फटका हा सोयाबीन आणि कापूस या पिकाला सर्वाधिक बसला आहे.

हे सुद्धा वाचा


आता यंदा डिसेंबरपर्यंत राज्यासह देशात पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जर डीसेंबरपर्यंत पाऊस झाल्यास कापूस या पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे.