AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केवळ 25 हजारांच्या डाउन पेमेंटवर घरी आणा रॉयल एनफील्ड क्लासिक 350, महिन्याला द्यावे लागतील फक्त एवढे रुपये

रॉयल एनफील्डने अलीकडेच आपल्या क्लासिक 350 बाईकची अपडेटेड आवृत्ती बाजारात आणली आहे, ज्यात नवीन वैशिष्ट्यांसह एक नवीन रंग पर्याय देण्यात आला आहे.

केवळ 25 हजारांच्या डाउन पेमेंटवर घरी आणा रॉयल एनफील्ड क्लासिक 350, महिन्याला द्यावे लागतील फक्त एवढे रुपये
रॉयल एनफील्ड क्लासिक 350 2021 ची भारतात डिलिव्हरी सुरु
| Edited By: | Updated on: Jul 28, 2021 | 5:51 PM
Share

नवी दिल्ली : टू व्हीलर सेगमेंटमध्ये अनेक प्रकारच्या बाईक व स्कूटर बाजारात आल्या आहेत. बहुतांश लोक आता इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दर्शवित आहेत, तर बरेच जण अजूनही स्कूटरला प्राधान्य देतात. परंतु या यादीमध्ये असेही बरेच लोक आहेत ज्यांना क्रूझर बाईक्स आवडतात आणि प्रवास किंवा ऑफ रोडिंगसाठी या बाइक्सचा वापर करतात. रॉयल एनफील्ड हे भारतात सर्वाधिक अग्रेसर असलेले नाव आहे. (Bring home the Royal Enfield Classic 350 on a down payment of only Rs 25,000)

क्लासिक 350 बाईकची अपडेटेड आवृत्ती बाजारात

रॉयल एनफील्डने अलीकडेच आपल्या क्लासिक 350 बाईकची अपडेटेड आवृत्ती बाजारात आणली आहे, ज्यात नवीन वैशिष्ट्यांसह एक नवीन रंग पर्याय देण्यात आला आहे. बाईकची सुरुवातीची किंमत 1.79 लाख रुपये असली तरी, आपल्याला टॉप मॉडेलसाठी 2.06 लाख रुपये द्यावे लागतील. दुसरीकडे, जर तुम्हाला बाईक आवडली असेल आणि ती विकत घेण्यास सक्षम नसाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक पर्याय घेऊन आलो आहोत.

25 हजारांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करा बाईक

बाईकबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपण बाईकदेखो वेबसाइटला भेट देऊन ईएमआय कॅल्क्युलेटर वापरू शकता. यानुसार आपण 25 हजारांच्या डाउन पेमेंटवर 1.79 लाख रुपयांची रॉयल एनफील्ड क्लासिक बाईक खरेदी करू शकता. वेबसाइटच्या ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, 25 हजार रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला दरमहा 4,446 रुपये ईएमआय द्यावा लागेल. कर्जाचा कालावधी 60 महिने असेल आणि तुम्हाला वार्षिक 6 टक्के दराने व्याज आकारले जाईल.

वैशिष्ट्ये

या मोटरसायकलला 346 सीसी इंजिन देण्यात आले आहे जे इंधन इंजेक्शन तंत्रज्ञानावर आधारीत आहे. हे इंजिन आपल्याला 19.36PS पॉवर आणि 28Nm टॉर्क देते. तसेच, यामध्ये आपल्याला 5-स्पीड गिअरबॉक्स देखील देण्यात आला आहे. ही बाईक 2160 मिमी लांबी, 790 मिमी रुंद आणि 1090 मिमी उंच आहे. तर तिचे वजन 192 किलो आहे. दुसरीकडे, वैशिष्ट्यांच्या बाबतीत, यात आपल्याला अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम म्हणजेच एबीएस, इंजिन किल स्विच, लो ऑईल इंडिकेटर, बॅटरी इंडिकेटर अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. रॉयल एनफील्डने काही काळापासून आपल्या बाईक्स अपडेट केल्या आहेत. यापूर्वी बाईकच्या काही पार्टविषयी वापरकर्ते तक्रार करत असत आता कंपनीने ते पूर्णपणे बदलली आहे. आता कंपनीच्या बाईक्स अधिक अपडेट वैशिष्ट्यांसह आल्या आहेत. (Bring home the Royal Enfield Classic 350 on a down payment of only Rs 25,000)

इतर बातम्या

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्क्यांची कपात

सावधान! तिसऱ्या लाटेआधीच बारामतीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; प्रशासनाचे धाबे दणाणले

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.