AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोलच्या वाढत्या किंमतींचं टेन्शन विसरा, 84 Kmpl मायलेज देणाऱ्या ‘या’ तीन बाईक खरेदी करा

पेट्रोलच्या वाढत्या किंमती आणि महागणाऱ्या गाड्या यामुळे ग्राहकांसमोर नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, अजूनही असे बरेच ग्राहक आहेत, जे सेकंड हँड बाइकला पहिला पर्याय मानतात.

पेट्रोलच्या वाढत्या किंमतींचं टेन्शन विसरा, 84 Kmpl मायलेज देणाऱ्या 'या' तीन बाईक खरेदी करा
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 8:17 PM
Share

मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमती आणि महागणाऱ्या गाड्या यामुळे ग्राहकांसमोर नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, अजूनही असे बरेच ग्राहक आहेत, जे सेकंड हँड बाइकला पहिला पर्याय मानतात. आजकाल बाजारात अशा बर्‍याच वेबसाइट्स आहेत ज्या आपल्याला कमी किंमतीत दमदार फीचर्ससह सेकंड हँड बाईक देतात. अशा परिस्थितीत, आपणदेखील बाईक खरेदी करण्याची योजना आखत असाल तर आम्ही आज आपल्यासाठी तीन उत्तम पर्याय आणले आहेत. (Buy these three bikes and get 84kmpl mileage, check list and details)

वापरलेली बाईक खरेदी करण्यासाठी आपण Droom.in ची मदत घेऊ शकता आणि या साईटवर जाऊन आपल्या पसंतीच्या बाईकची निवड करू शकता. येथे आपल्याला अनेक प्रकारच्या बाईक खरेदी करता येतील. ज्यामध्ये बेसिकपासून ते रेसिंग आणि जास्त सीसी वाल्या गाड्यांचा समावेश आहे. या साईटवर सर्व प्रकारच्या बाइक्स आढळतील. त्याचबरोबर येथे विविध ब्रँडची वाहने विकली जातात. आज आम्ही तुमच्यासाठी जी तीन वाहने घेऊन आलो आहोत त्या उत्तम मायलेज देतात, चला तर मग संपूर्ण यादी जाणून घेऊया.

बजाज पल्सर

या बाईकची भारतात मोठी क्रेझ आहे. 2013 चं मॉडेल असलेली ही बाईक फर्स्ट ओनरद्वारे विकली जात आहे. आतापर्यंत ही बाईक 11,000 किमोमीटरपर्यंत धावली आहे. दुसरीकडे, ती बाईक खरेदी केल्यावर, तुम्हाला 65 किमीपर्यंतचं मायलेज मिळेल. या बाईकमध्ये 149 सीसी इंजिन आहे जे 14.85bhp पॉवर देतं. या बाईकचं व्हील 17 इंचांचं आहे. ही बाईक 29000 रुपयांमध्ये विकली जात आहे.

TVS अपाचे RTR 160 4V डिस्क

टीव्हीसची ही रेसिंग बाईक 2019 चं मॉडेल आहे. ही बाईकदेखील फर्स्ट ओनरकडून विकली जात आहे. ही बाईक आतापर्यंत 95,000 किलोमीटरपर्यंत धावली आहे. या बाईकमध्ये 160cc चं इंजिन देण्यात आलं आहे जे 16.10 bhp पॉवर जनरेट करतं. या बाईकचं व्हील 17 इंचांचं आहे. ही गाडी 52,000 रुपयांमध्ये विकली जात आहे.

होंडा ड्रीम Yuga

हे 2019 चं मॉडेल आहे. ही बाईक फर्स्ट ओनरद्वारे विकली जात आहे. ही गाडी आतापर्यंत 12,500 किलोमीटरपर्यंत धावली आहे. ही बाईक 84 किलोमीटरपर्यंतचं मायलेज देते. यामध्ये तुम्हाला 110cc चं इंजिन मिळेल, जे 8.25bhp पॉवर देतं. ही बाईक 43,000 रुपयांमध्ये विकली जात आहे.

इतर बातम्या

31 ऑगस्टपर्यंत स्वस्त बाईक खरेदी करण्याची संधी, केटीएम 250 अ‍ॅडव्हेंचरच्या किंमतीत 25000 रुपये कपात

फक्त 25 हजार रुपयांमध्ये घरी आणा हिरोची ही आलिशान स्कूटर, 65 किमीच्या मायलेजसह मिळवा ही जबरदस्त ऑफर

OLA इलेक्ट्रिक स्कूटरचा लाँचिंगआधीच बाजारात धुमाकूळ, 24 तासात 1 लाख बुकिंग्सचा टप्पा पार

(Buy these three bikes and get 84kmpl mileage, check list and details)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.