AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात

होंडा अमेझ प्रामुख्याने मारुती सुझुकीशी स्पर्धा करते. डिझायर आणि ह्युंदाई ऑरा या गाड्यांना अमेझकडून जोरदार टक्कर मिळत आहे.

शानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात
Honda Amaze
| Edited By: | Updated on: Jul 24, 2021 | 11:12 PM
Share

मुंबई : होंडा कार्स इंडियाच्या सिटी आणि अमेझ या दोन गाड्यांना देशांतर्गत बाजारात सर्वाधिक मागणी आहे. गेल्या वर्षी होंडा सिटीला मोठं अपग्रेड मिळालं आहे. या कारच्या पाचव्या जनरेशन मॉडेलचे जुलै 2020 मध्ये अनावरण करण्यात आले होते. मिड साईज सेडान खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी या दोन गाड्या पहिली पसंती ठरत आहेत. होंडा सिटी अपग्रेड केल्यानंतर कंपनी आता होंडा अमेझचं (Honda Amaze) फेसलिफ्टेड व्हर्जन सादर करणार आहे. (New Honda Amaze will launch in India on August 17 with many updates)

होंडा अमेझ प्रामुख्याने मारुती सुझुकीशी स्पर्धा करते. डिझायर आणि ह्युंदाई ऑरा या गाड्यांना अमेझकडून जोरदार टक्कर मिळत आहे. अमेझच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये इंटिरियर आणि एक्सटीरियरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. नवीन अमेझ 2018 च्या सुरूवातीपासूनच विकली जात आहे. 2018 ऑटो एक्सपोद्वारे या कारने स्थानिक मार्केटमध्ये पदार्पण केलं होतं.

सुधारित अमेझच्या बाह्यभागामध्ये सामान्य मिड-लाइफ बदल दिसतील. यामध्ये फुल एलईडी हेडलाइट्स, रिडिझाईन व्हील्स, पुन्हा डिझाइन केलेले फ्रंट आणि रियर बम्पर, नवीन कलर स्कीम्सदेखील मिळतील. अपडेटेड Honda Amaze मध्ये आतील बाजूस नवी फॅब्रिक अपहोल्स्ट्री आणि ट्रिम इंसर्ट मिळतील, अशी आशा आहे. यामध्ये एक इलेक्ट्रिक सनरूफदेखील असेल.

दमदार इंजिन

आधीपासून असलेले काही फीचर्स नव्या व्हर्जनमध्येदेखील असतील. दरम्यान या कारच्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये जुनं 1.2-लीटर फोर सिलेंडर i-VTEC पेट्रोल इंजिन दिलं जाऊ शकतं, जे 90 हॉर्सपावर आणि 110 एनएम पीक टॉर्क जनरेट करेल. पॉवरट्रेन पाच-स्पीड मॅन्युअल किंवा सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेलं असेल.

1.5 लीटर फोर सिलेंडर डिझेल इंजिन 100 हॉर्सपॉवर आणि 200 एनएम पीक टॉर्क जनरेट करतं आणि मानक म्हणून पाच-स्पीड मॅन्युअलशी जोडलेलं आहे. तर पर्यायी सीव्हीटी ऑटो त्याच इंजिनचा वापर करून 80 हॉर्सपॉवर आणि 160 एनएम पीक टॉर्क जनरेट करतं. डिझेल सीव्हीटी संयोजन अमेझसाठी उत्तम आहे आणि सेगमेंट-फर्स्ट इलेक्ट्रिक सनरूफ नवीन ग्राहकांना आकर्षित करू शकेल.

मिड साईज SUV सेगमेंटमध्ये तगडी स्पर्धा

कॉम्पॅक्ट एसयूव्हीची योजना आखत असताना, जपानी निर्माता मिड साईज एसयूव्हीवरही काम करत आहे. ही कार N7X कॉन्सेप्टच्या प्रॉडक्शन आवृत्तीसारखीच असू शकते, जी इंडोनेशियासारख्या बाजारात BR-V ची जागा घेते. असे म्हटले जात आहे की, ही कार सिटीच्या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.

इतर बातम्या

भारतात Hyundai च्या ‘या’ SUV ची रेकॉर्डब्रेक विक्री, एका महिन्यात 11000 हून अधिक बुकिंग्स

मारुती, टाटा आणि रेनॉच्या ‘या’ तीन गाड्यांना मध्यमवर्गीय कुटुंबांची पसंती

ग्रामीण भागात मारुती सुझुकीला वाढती मागणी; युनिट विक्रीचा आकडा 50 लाखांवर

(New Honda Amaze will launch in India on August 17 with many updates)

Follow Us
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित.